Join us  

एक्झिट पोलमुळे शेअर बाजार सूसाट..; Reliance, Tata, SBI, LIC, Airtel मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 3:33 PM

काही मिनिटांतच देशातील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 3.73 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Share Market News : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्याच्या दोन दिवसांनंतर शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी विक्रमी पातळी गाठली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स, सुरुवातीच्या सत्रात 2,777.58 अंकांनी किंवा 3.75 टक्क्यांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्सने विक्रमी 76,738 अंकांची पातळी गाठली. तर गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स 73३,961 अंकांवर बंद झाला होता. 

आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य निर्देशांक निफ्टीबद्दल बोललो, तर ट्रेडिंग सत्रादरम्यान 3.50 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 808 अंकांची वाढ पाहिली आणि 23,338.70 अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. तर शुक्रवारी निफ्टी 22,530.70 अंकांवर बंद झाला होता. या वाढीचा परिणाम देशातील आघाडीच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपवर दिसून आला. गेल्या आठवड्यात देशातील प्रमुख 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती, त्याच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये आज 3.73 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली. 

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये सोमवारी सर्वाधिक 86,446.14 कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे कंपनीचे एकूण मार्केट कॅप 20,21,163.26 कोटी रुपयांवर आले. रिलायन्सनंतर SBI ला सर्वाधिक फायदा झाला आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान SBI च्या मार्केट कॅपमध्ये 62,785.13 कोटी रुपयांची वाढ झाली आणि कंपनीचे एकूण मार्केट कॅप 8,03,617.17 कोटी रुपयांवर आले. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीलाही 50 हजार कोटींहून अधिक नफा झाला आहे. ट्रेडिंग सत्रात HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 50,690.5 कोटींनी वाढले आणि एकूण मार्केट कॅप 12,14,774.35 कोटी रुपये झाले. 

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीच्या मार्केट कॅपमध्येही 38,134.64 कोटी रुपयांची वाढ झाली. ट्रेडिंग सत्रात कंपनीचे मार्केट कॅप 13,65,791.85 कोटी रुपयांवर आले आहे. तर, दुसरीकडे ICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 36,491.06 कोटी रुपयांची वाढ झाली आणि एकूण मार्केट कॅप 8,23,720.77 कोटी रुपयांवर आले. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या मार्केट कॅपमध्येही चांगली वाढ झाली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 29,917.23 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आणि एकूण मार्केट कॅप 6,70,449.75 कोटी रुपये झाले. 

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलच्या मार्केट कॅपमध्ये 27,087.44 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर कंपनीचे एकूण मार्केट कॅप 8,05,422.84 कोटी रुपये झाले. तर, हिंदुस्थान युनिलिव्हर ही देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी आहे. ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 16,717.34 कोटी रुपयांची वाढ होऊन ते 5,63,866.66 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या बाजार भांडवलात 13,618.21 कोटी रुपयांची वाढ झाली आणि एकूण बाजार भांडवल 5,97,478.49 कोटी रुपयांवर आले. तसेच, देशातील टॉप 10 कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ITC ने 11,735.63 कोटी रुपयांची कमाई केली असून कंपनीचे एकूण मार्केट कॅप 5,43,772.04 कोटी रुपये आले आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारमतदानोत्जतर जनमत चाचणीलोकसभा निवडणूक २०२४ निकाल