Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:35 PM2024-01-29T14:35:54+5:302024-01-29T14:36:03+5:30

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे.

Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top | रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

Share Market News: देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या (Budget 2024) दोन दिवस आधी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आजच्या तेजीमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायंट इंडस्ट्रीज (RIL) ने मोठी आघाडी घेतली आहे. अदानी समूहाच्या(Adani Group) सर्व कंपन्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्रानेही वेग पकडल्याचे पाहायला मिळत आहे. 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेट वेगाने वर चढले. बीएसईच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 600 हून अधिक अंकांनी झेप घेतली, तर एनएसईच्या निफ्टीनेही 150 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. दुपारी 1.30 वाजता सेन्सेक्स 1,082.23 किंवा 1.53% च्या वाढीसह 71,782.91 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीमध्ये 325.50 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या मार्केट कॅपमध्ये 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या शेअर्समध्ये वादळी वाढ
आजच्या तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीजची सर्वात मोठी भूमिका आहे. RIL चे शेअर्स आज रु. 2729 वर उघडले आणि हळूहळू वाढले. सध्या हे रु. 2866 वर व्यवहार होत आहे. RIL शेअर्स 5.50 टक्क्यांहून अधिक वाढले, ONGC 7 टक्क्यांहून अधिक वाढले, HDFC बँक 1.50% वाढले, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 5.75 टक्क्यांनी वाढले आणि अदानी ग्रीन 5 टक्क्यांनी वाढले.

याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे. त्रैमासिक निकालानंतर शक्ती पंपचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले आहेत. याशिवाय दोडला डेअरीमध्येही 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मिडकॅपमध्ये अदानी ग्रीन एनर्जी सुमारे 5 टक्क्यांनी वाढले आहेत. 

दोन दिवसांनी अंतरिम अर्थसंकल्प
येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. हा अर्थसंकल्प भारताच्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. मात्र, या मिनी बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाणार नसल्याचे त्यांनी आधीच सूचित केले आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title: Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.