Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी

गेल्या आठवड्यात Share Market मध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 02:45 PM2024-05-26T14:45:15+5:302024-05-26T14:45:40+5:30

गेल्या आठवड्यात Share Market मध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

Share Market News : Strong performance of Mukesh Ambani's Reliance; Earned ₹60000 crore in 5 days | मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी

Share Market News : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मागील आठवडा खुप फायदेशीर ठरला. गेल्या आठवड्यात BSE सेन्सेक्सच्या टॉप-10 मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या बाजारमूल्यात प्रचंड वाढ झाली. यामुळे त्यांच्या शेअरधारकांना मोठा नफा झाला. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला. अवघ्या पाच दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजने तब्बल 60,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. 

मूल्य 20 लाख कोटींच्या पुढे 
सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी ज्या नऊ कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले, त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एचडीएफसी बँक, एलआयसी आणि टीसीएसचा समावेश आहे. पण कमाईच्या बाबतीत रिलायन्स आघाडीवर राहिली. कंपनीच्या शेअर्सने एवढा वेग घेतला की, बाजारमूल्य पुन्हा एकदा 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. आपण आकडेवारी पाहिली तर, कंपनीचे MCap 20,02,509.35 कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे रिलायन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत 61,398 कोटी रुपयांची वाढ झाली. 

एचडीएफसी-एलआयसीची दमदार कामगिरी 
रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर एचडीएफसी बँक सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत होती. गेल्या आठवड्यात HDFC बँकेचे MCap Rs 38,966.07 कोटींनी वाढून Rs 11,53,129.36 कोटी झाले. तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. LIC मार्केट कॅप 6,51,348.26 कोटी रुपयांपर्यंत वाढले, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी 35,135.36 कोटी रुपयांची कमाई केली.

रिलायन्स सर्वाधिक पुढे
बाजार भांडवलाच्या वाढीनंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे वर्चस्व सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिले. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय, एलआयसी, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Share Market News : Strong performance of Mukesh Ambani's Reliance; Earned ₹60000 crore in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.