Stock Markets : आठवड्यानंतर अखेर भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला. मात्र, त्यानंतर बाजारात तीव्र चढउतार दिसून आले. आठवडाभरातील चढ-उतारानंतर शेअर बाजारात गुरुवारी (१४ नोव्हेंबर) फ्लॅट क्लोजिंग झाले. दिवसभरातील अस्थिरतेनंतर बेंचमार्क निर्देशांक सपाट बंद झाले. सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. निफ्टी २६ अंकांनी घसरून २३,५३२ वर बंद झाला. सेन्सेक्स ११० अंकांनी घसरून ७७,५८० वर बंद झाला आणि निफ्टी बँक ९१ अंकांनी वाढून ५०,१७९ वर बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टीमधील निम्म्याहून अधिक कंपन्यांचे शेअर्स तोट्यात बंद
गुरुवारच्या घसरणीत सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले आणि उर्वरित १३ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ५० मधील ५० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स घसरुन बंद झाले तर उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर्स वधारले.
हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स आज सर्वाधिक घसरले
आज सेन्सेक्स कंपन्यांमधील हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स २.८७ टक्क्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय नेस्ले इंडियाचे शेअर्स २.१२ टक्के, एनटीपीसी १.९३ टक्के, अदानी पोर्ट्स १.८२ टक्के, पॉवर ग्रीड १.७९ टक्के, इंडसइंड बँकेचे शेअर्स १.७६ टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह १.४२ टक्क्यांनी, टाटा मोटर्सचे १.३२ टक्क्यांनी, आयटीसीचे १.०९ टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, टीसीएस आणि इन्फोसिसचे शेअर्सही लाल रंगात बंद झाले.
कोटक महिंद्रा बँकेत चांगली वाढ दिसून आली
दुसरीकडे आज सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्रा बँकेचा शेअर सर्वाधिक १.२९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. रिलायन्सचे शेअर्स १.२२ टक्के, टेक महिंद्रा ०.७८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर ०.७३ टक्के, एशियन पेंट्स ०.६९ टक्के, एचडीएफसी बँक ०.६८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.४१ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.३३ टक्के, भारती एअरटेल ०.२८ टक्के, टायटन ०.१० टक्क्यांनी घसरले.