Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 09:52 AM2024-10-25T09:52:12+5:302024-10-25T09:52:12+5:30

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली.

Share Market Opening First minor boom then decline some shares opened with big declines | Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडला. बीएसई सेन्सेक्स १२२.१८ अंकांच्या तेजीसह ८०,१८७.३४ अंकांवर उघडला, तर दुसरीकडे एनएसई निफ्टी देखील १८.५४ अंकांनी वधारून २४,४१८.०५ अंकांवर उघडला. मात्र त्यानंतर लगेचच सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण झाली. गुरुवारी शेअर बाजार सकाळी ग्रीन झोनमध्ये उघडला आणि रेड झोनमध्ये बंद झाला. 

शुक्रवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये उघडले, तर ८ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. याशिवाय २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्हता. तर निफ्टी ५० च्या ५० पैकी ३० कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

यामध्ये सर्वाधिक वाढ

सेन्सेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेनं सर्वाधिक १.२० टक्क्यांची वाढ नोंदवली. आयटीसी ०.८७ टक्के, एचसीएल टेक ०.७२ टक्के, नेस्ले इंडिया ०.६७ टक्के, टाटा मोटर्स ०.५६ टक्के, एसबीआय ०.४५ टक्के, एचडीएफसी बँक ०.३९ टक्के, मारुती सुझुकी ०.३४ टक्के, भारती एअरटेल ०.३२ टक्के, आरआयएल ०.२९ टक्क्यांनी वधारले.

याशिवाय कोटक महिंद्रा बँक ०.२४ टक्के, इन्फोसिस ०.२३ टक्के, पॉवरग्रिड ०.२२ टक्के, एशियन पेंट्स ०.२२ टक्के, अदानी पोर्ट्स ०.२२ टक्के, सन फार्मा ०.१९ टक्के, टीसीएस ०.१४ टक्के, टायटन ०.०९ टक्के, टाटा स्टील ०.०७ टक्के, बजाज फायनान्स ०.०६ टक्क्यांनी वधारले. महिंद्रा अँड महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

यामध्ये घसरण

दुसरीकडे इंडसइंड बँकेचा शेअर ६.१७ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला. एनटीपीसी २.२५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.९७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२९ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.२४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.०९ टक्के आणि टेक महिंद्रा ०.०३ टक्क्यांनी घसरले.

Web Title: Share Market Opening First minor boom then decline some shares opened with big declines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.