Join us

शेअर बाजार ८५ हजारांच्या पार? अमेरिकेतील फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:32 AM

याशिवाय अमेरिकेचे औद्योगिक उत्पादन, जपानमधील चलनवाढ, भारतामधील चलनवाढीची आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली खरेदी या घटकांवरही बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.

प्रसाद गो. जोशी

आगामी सप्ताहामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होत असून त्यामध्ये व्याजदरात कपातीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यामुळे भारतातील परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होणार असून बाजार लवकरच ८५ हजारांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकेचे औद्योगिक उत्पादन, जपानमधील चलनवाढ, भारतामधील चलनवाढीची आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली खरेदी या घटकांवरही बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.

जेवढा प्रवास, तेवढाच टाेल; कशी आहे जीपीएसवर आधारित टाेल संकलन यंत्रणा?

गतसप्ताह बाजारासाठी चांगलाच राहिला. या सप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांकांची नोंद केली. त्याचप्रमाणे सेन्सेक्स प्रथमच ८३ हजाराचा आकडा पार करून गेला. त्याचप्रमाणे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही चांगली वाढ झालेली दिसून आली. अ्रमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात प्रथम पाव टक्का कपात होण्याचा अंदाज असला तरी बाजाराला अर्धा टक्का कपातीची अपेक्षा आहे. यामुळे अमेरिकेतील बॉण्डसवरील नफा कमी होणार आहे. परिणामी परकीय संस्थांकडून भारतासह आशियामधील बाजारात अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

भारतामधील चलनवाढीची आकडेवारी बाजाराला अनुकूल येण्याची अपेक्षा असून त्यानंतर बाजार वाढेल अशी शक्यता आहे.

८.५२ लाख कोटींची भांडवलामध्ये वाढ

भारतीय शेअर बाजारामधील कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ८.५२ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला त्याो;ळी असलेल्या किंमतींनुसार बाजाराचे एकूण भांडवलमूल्या ४,६८,७१,६०१.७९ कोटी रुपये झाले आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार