Join us

Share Market: Paytm चा शेअर गडगडला; नेटकऱ्यांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 2:51 PM

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज दुपारी साडेबारा वाजता तब्बल १२०० अंकांनी कोसळून ५७,८५५.७६ वर आला आहे. तर निफ्टी ४०० अकांनी कोसळून १७,२६१ च्या स्तरावर खाली आला आहे

मुंबई - जगभरात ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वत्र व्यक्त होत असल्याने जागतिक बाजारपेठाही काही प्रमाणात थंड पडल्याचं दिसून येते. त्याचा, परिणाम गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. आज मुंबई स्टॉक एक्चेंजमध्ये कमालीची घसरण पाहायाला मिळाली. त्यात, पेटीएमचे शेअर गडगडल्याने नेटकऱ्यांनी पेटीएमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मजेशीर व्हिडिओ, चित्रपटांचे डॉयलॉग आणि मिम्सट्विटरवर व्हायरल होत आहेत.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज दुपारी साडेबारा वाजता तब्बल १२०० अंकांनी कोसळून ५७,८५५.७६ वर आला आहे. तर निफ्टी ४०० अकांनी कोसळून १७,२६१ च्या स्तरावर खाली आला आहे. तर, पेटीएमच्या शेअरने आतापर्यंतचा आपला नीचांकी शेअर दर गाठला आहे. सोमवारी पेटीएमच्या शेअरचा दर 910 रुपयांपर्यंत आला. पेटीएमच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नेटीझन्सकडून या सातत्याने पेटीएमचे शेअर घसरत असल्याने पेटीएमला ट्रोल केलं जात आहे.   

पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications Ltd च्या शेअर दरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास 5.27 टक्के घसरण दिसून आली. पेटीएमच्या शेअरने यावेळी 909 रुपयांचा दर गाठला होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक नीचांकी दर होता. 

शेअर बाजारात पेटीएम लिस्ट झाल्यानंतर सातत्याने शेअर दरात घसरण दिसून येत आहे. मागील आठवड्यात पेटीएमच्या शेअरचा दर 1000 रुपयांखाली आला होता. मागील एका महिन्यात पेटीएम शेअर दरात 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 

गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील हा सीन असून पेटीएमचे शेअर गडगडल्यामुळे शेअर होल्डरचा होणारा संताप या मिम्समधून व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारमिम्सट्विटर