Join us

शेअर बाजारात ओह माय क्रॉन! ११९० अंशांनी गडगडला निर्देशांक, ६.७९ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 5:36 AM

ओमायक्रॉनच्या संसर्गाची दहशह जगभरात पसरत असताना आता या दहशतीचा दंश शेअर बाजारांनाही झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :ओमायक्रॉनच्या संसर्गाची दहशह जगभरात पसरत असताना आता या दहशतीचा दंश शेअर बाजारांनाही झाला आहे. ओमायक्रॉनच्या धास्तीमुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ठप्प होण्यात होऊ शकतो, हे लक्षात घेत जगभरातील शेअर बाजार गडगडले. या गडगडाटामुळे गुंतवणूकदारांचे ६.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजाराचे सर्वच निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले आहेत.

घसरणीची दोन कारणे

- ओमायक्रॉनच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. 

- परकीय वित्तसंस्थांनी मोठी विक्री केली.

नेमके काय घडले?

जगभरामध्ये ओमायक्रॉनने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला असून काही देशांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊनही जाहीर केले आहे. याचा अर्थव्यवस्थेवर तसेच पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. 

अमेरिकेसह युरोपच्या मध्यवर्ती बँकांनी कडक धोरण स्वीकारल्याने गुंतवणूकदारांचे मनोधैर्य कमी होत आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये विक्रीचा मोठा मारा झाला. खनिज तेलाचे दर काहीसे कमी झाल्याने अधिकच चिंता निर्माण होऊन बाजार खाली आले.

सेन्सेक्समधील आतापर्यंतच्या मोठ्या घसरणी

२४ ऑगस्ट २०१५     १६२४ अंश१२ मार्च २०२०          २९१९  अंश१६ मार्च २०२०          २७१३  अंश२३ मार्च २०२०          ३९४३ अंश४ मे २०२०                २००२ अंश१३ एप्रिल २०२१        १७०८ अंश२० डिसेंबर २०२१     ११९० अंश 

टॅग्स :शेअर बाजारओमायक्रॉन