Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

मान्सूनच्या कोसळधारांचे वेध असताना दुसरीकडे शेअर बाजारात  गुंतवणूकदारांना कोसळधारेचा अनुभव येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:48 AM2022-06-14T05:48:19+5:302022-06-14T05:48:44+5:30

मान्सूनच्या कोसळधारांचे वेध असताना दुसरीकडे शेअर बाजारात  गुंतवणूकदारांना कोसळधारेचा अनुभव येत आहे.

Share market plunged by 1457 points sinking 6 lakh crore investors | कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

कोसळधारा! Share Market ची १,४५७ अंकाची आपटी, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले

मुंबई :

मान्सूनच्या कोसळधारांचे वेध असताना दुसरीकडे शेअर बाजारात  गुंतवणूकदारांना कोसळधारेचा अनुभव येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १,४५७ अंकांनी कोसळून ५२,८४६ अंकांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवशी ६.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

किंचित दिलासा 
खाण्याचे सामान काही प्रमाणात स्वस्त झाल्याने किरकोळ महागाई ७.७९ टक्क्यांवरून ७.०४ टक्क्यांवर आली. 

बाजार आपटीची कारणे काय?
जागतिक बाजारात घसरण
भारतीय बाजारातून काढून घेण्यात येत असलेला पैसा
रुपयाची ढासळलेली पतही कारणीभूत 
वाढती महागाई 

रुपया रडवणार 
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सोमवारी २० पैशांनी कोसळून ७८.१३ या नीचांकावर आला. यामुळे आयात वस्तू महाग होणार आहेत.

क्रिप्टो गडगडले
बिटकॉईनची किंमत ७.१४ टक्क्यांनी कोसळून २१,४०,८१४ रुपयांवर पोहोचली. इतर क्रिप्टोंमध्येही मोठी घसरण झाली

पुढे काय?
जागतिक स्तरावर मंदीसदृश वातावरण असून, कच्चे तेल १२० डॉलरवर पोहोचले आहेत. १५ जून रोजी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेअर बाजार कोसळू शकतात.

Web Title: Share market plunged by 1457 points sinking 6 lakh crore investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.