Join us  

250 टक्के परतावा देणाऱ्या या स्टॉकमध्ये दिग्गज व्यक्तीची मोठी गुंतवणूक, झटक्यात खरेदी केले 2.80 लाख शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 9:22 PM

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार हे अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करताना दिसतात. 

शेअर बाजारात कोणता स्टॉक खरेदी करावा, म्हणजे चांगला नफा मिळेल? हा एक असा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर क्वचितच कुणी अगदी बरोबर देऊ शकले. स्टॉक मार्केट हा एक अनिश्चिततेने बाजार आहे. यामुळे येथे गुंतवणूक करताना मोठा रिसर्च करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारातगुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करताना दिसतात. 

Porinju Veliyath यंच्या गुंतवणुकीवर नजर ठेवणारेही अनेक गुंतवणूकदार आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट आहे. Porinju Veliyath यांनी स्मॉल कॅप कंपनी Rubfila International च्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 

Porinju Veliyath यांची गुंतवणूक - शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार, Porinju Veliyath यांनी या स्टॉकवर मोठा डाव लावला आहे. बीएसईच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार, नुसार Porinju Veliyath यांनी कंपनीचे 2.80 लाख शेअर खरेदी केले आहेत. त्यांनी एका शेअरसाठी 78.39 रुपये मोजले आहेत. यानुसार त्यांनी संबंधित कंपनीत तब्बल 2,19,49,200 रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या एप्रिल ते जून पर्यंतच्या तिमाहीत शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, Porinju Veliyath आणि त्यांच्या पत्नींच्या नावे कंपनीचे शेअर नव्हते. याचाच अर्थ त्यांनी ही फ्रेश गुंतवणूककेली आहे. 

गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, या काळात कंपनीच्या शेअरचा भाव 9.19 टक्क्यांनी खाली आला आहे. ज्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरवर विश्वास दाखवला असेल आणि आता पर्यंत होल्ड केले असेल, त्याला आतापर्यंत 200 टक्क्यांचा परतावा मिळाला असेल. 27 मार्च 2020 रोजी बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 23 रुपये होती. तेव्हा पासून आतापर्यंत या शेअरने 256.39 टक्क्यांची उसळी घेतल्याचे दिसत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक