Join us

बजेटपूर्वी रॉकेट बनले 'हे' 15 PSU शेअर्स; तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 2:50 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या, म्हणजेच 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Share Market PSU Stock Rally : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या, म्हणजेच 23 जुलै रोजी देशाचा पूर्ण अर्थसंकल्प 2024-25 सादर करणार आहेत. तत्पूर्वी, शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दुपारी 2.45 वाजेपर्यंत सेन्सेक्स 70 अंकांनी घसरुन 80,533 वर आला, तर 15 अंकांनी घसरुन 24,515 वर होता. बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्सपैकी सरकारी कंपन्या वगळता, इतर सर्व शेअर्स घसरले. सरकारी कंपन्यांचे शेअर्स मात्र रॉकेट वेगाने वाढत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) संसदेसमोर मांडला. लोकसभेत सादर झालेल्या या आर्थिक सर्वेक्षणात सरकारचा फोकस प्रायव्हेट सेक्टर आणि PPP वर होता. या आर्थिक सर्वेक्षण FY25 मध्ये देशाचा जीडीपी ग्रोथ अंदाजे 6.5 ते 7 टक्क्यांपर्यंत असेल, असा उल्लेखही करण्यात आला. त्यामुळेच, शेअर बाजारात सरकारी कंपन्यांचे शेअर्स वधारले. संरक्षण क्षेत्रापासून ते अक्षय ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या शेअर्समध्ये दमदार वाढ दिसून आली.

कोणत्या शेअर्समध्ये वाढ झाली?संरक्षण क्षेत्रातील कंपनी कोचीन शिपयार्डचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 2,670 रुपयांवर पोहोचला. तर, एचएएलचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 4975 रुपयांवर होते. याशिवाय, माझगाव डॉक शिपयार्डच्या शेअर्समध्येही 4 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. हा शेअर 5352 रुपयांवर व्यवहार करत आहे. याशिवाय बीईएल, भारत डायनॅमिक आणि इतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

याशिवाय, रिन्‍यूएबल एनर्जी स्टॉक REC LTD चे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 618 रुपयांवर आले. तर, IREDA चे शेअर्स किंचित वाढून रु. 272 ​​वर आले. याशिवाय, SJVN च्या शेअर्समध्येही सुमारे 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. इतर ऊर्जा शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली आहे.

या PSU कंपन्यांचे शेअर्सही वधारलेNBCC चे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांनी वाढून 184 रुपयांवर होते. रेल्वे विकास निगमचे शेअर्स 2.25 टक्क्यांनी वाढून 627 रुपयांवर पोहोचले. बीपीसीएल, एनटीपीसी, एलआयसी, कॅनरा बँक आणि आयओसीएलचे शेअर्स 4 टक्क्यांपर्यंत वाढले.

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. )

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक