Lokmat Money > बिझनेस न्यूज > खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!

खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!

या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12,469.44% टक्क्यांचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:14 AM2024-06-10T11:14:54+5:302024-06-10T11:15:57+5:30

या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12,469.44% टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Share market rajnish retail stock split news Khata-khata return 72 paisa share to ₹90; A decision of the company and the investor to buy broke | खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!

खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!

शेअर बाजारातील रजनीश रिटेलचा शअर आपल्या  गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 375 टक्क्यांची उसळी घेत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता या कंपनीने शेअर स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी रत्न, दागिने आणि घड्याळांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

या कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी, ४% पर्यंत वधारून ९०.५० रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १२,४६९.४४% टक्क्यांचा परतावा दिला आहे. या काळात याशेअरची किंमत ७२ पैशांवरून सध्याच्या पातळीवर पोहोचली आहे.

रजनीश रिटेल स्टॉक स्प्लिट -
आपल्या संचालक मंडळाने १:५ प्रमाणात अर्थात एका इक्विटी शेअरची ५ इक्विटी शेअर्समध्ये उप-विभाजन करण्याला मंजुरी दिली आहे. जी कंपनीच्या सदस्यांच्या आणि इतर नियामक/वैधानिक मान्यतांच्या अधीन आहे. असे कंपनीने याच महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते.

स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड डेट -
रजनीश रिटेलने आपल्या एक्सचेन्ज फायलिंगमध्ये म्हटले आहे, "इक्विटी शेअर्सच्या उप-विभाजनाची तारीख बोर्डाकडून निश्चित केली जाईल. यानंतर, सदस्यांची मंजुरी मिळाल्यानंतर, स्टॉक एक्सचेन्जला सूचित केले जाईल."
 
या स्मॉल कॅप कंपनीने एक नवे सलून लाँच करून सौंदर्य उद्योगात प्रवेश करत आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला  आहे. रजनीश रिटेल लिमिटेडच्या ब्रँड अर्बन सलूनने मुंबईतील मालाड जिल्ह्यात एव्हरशाइन नगरमध्ये एक नवे दुकान सुरू केल आहे. यांनी ब्यूटी आणि वेलनेसचे दुकान सुरू केले आहे. या उद्योगात जबरदस्त वृद्धी दिसत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market rajnish retail stock split news Khata-khata return 72 paisa share to ₹90; A decision of the company and the investor to buy broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.