Rekha Jhunjhunwala : जगात आर्थिक मंदी सुरू असताना भारतीय शेअर बाजारात मात्र संधी उपलब्ध झाली आहे. या आठवड्यात सेनेस्कने ऐतिहासिक सर्वोच्च पातळी गाठली. गुरुवाच्या दिवशी अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले. दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचाही यात समावेश आहे. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील एक स्टॉक रॉकेट सारखा वर जात आहे. शुक्रवारी बीएसईवर तो २.१२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे जलशुद्धीकरण कंपनी व्हीए टेक वाबागमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. या शेअरची सध्याची किंमत १४०२ रुपये आहे. शुक्रवारी या शेअरने व्यवहारादरम्यान 5 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि १२४४ रुपयांवर पोहोचला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा शेअर 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होता. मनीकंट्रोलच्या एका बातमीनुसार, १२ ऑक्टोबर २०२३ रोजी या शेअरची किंमत ४३६ रुपये होती. म्हणजेच जर कोणी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक ३.२१ लाखांपेक्षा जास्त झाली असती. ही वाढ केवळ ११ महिन्यांत झाली असती. म्हणजेच या शेअरने ११ महिन्यांत २३१ टक्के परतावा दिला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे ८ टक्के किंवा ५० लाख शेअर्स आहेत.
रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत किती वाढ?
या शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत गेल्या ११ महिन्यांत अब्जावधींनी वाढ झाली आहे. हे शेअर्स त्यांच्याकडे आधीपासूनच असण्याची शक्यता आहे. पण जर आपण गेल्या ११ महिन्यांचा हिशोब केला तर केवळ याच शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत ४८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नवीन टार्गेट
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सवर आपली तेजीची भूमिका स्वीकारली आहे. ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना ते खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, त्याची टारगेट किंमत १४४५ रुपयांवरून १५४१ रुपयांवर पोहचवण्यात आली आहे. शुक्रवारी हा शेअर १४४४ रुपयांवर पोहोचला होता. अॅक्सिस सिक्युरिटीजने 1700 रुपयांच्या टार्गेट किमतीसह या शेअरवर सट्टा लावण्याचे सुचवले आहे.
(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)