Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ, 95 टक्क्यांनी आपटून थेट ₹14 वर आला हा पॉवर शेअर

गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ, 95 टक्क्यांनी आपटून थेट ₹14 वर आला हा पॉवर शेअर

गेल्या एका वर्षात कर्जात बुडालेल्या या पॉवर कंपनीचे शेअर 19.49 टक्क्यांनी वधारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:55 PM2023-06-26T20:55:27+5:302023-06-26T20:55:48+5:30

गेल्या एका वर्षात कर्जात बुडालेल्या या पॉवर कंपनीचे शेअर 19.49 टक्क्यांनी वधारले आहेत.

share market Reliance group stock reliance power share huge down 95 percent heavy debt in firm | गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ, 95 टक्क्यांनी आपटून थेट ₹14 वर आला हा पॉवर शेअर

गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ, 95 टक्क्यांनी आपटून थेट ₹14 वर आला हा पॉवर शेअर

रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power share) शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त घसरण दिसून आली. कंपनीचा शेअर 4.41 टक्क्यांनी घसरून 14.10 रुपयांवर बंद झाला. यापूर्वी सलग काही सेशन्समध्ये रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गेल्या एका वर्षात कर्जात बुडालेल्या या पॉवर कंपनीचे शेअर 19.49 टक्क्यांनी वधारले आहेत.

रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या (VIPL) कर्जदात्यांनी एसबीआय कॅप्सला कर्ज निराकरण प्रक्रियेसंदर्भात सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. एसबीआय कॅप्स सल्लागार म्हणून व्हीआयपीएलच्या थकित कर्जाच्या विक्रीसाठी किंवा वन टाईम सोल्यूशन (OTS) बोली मागवतील. याशिवाय, मुख्य बोलीकर्त्याच्या निवडीशी संबंधित मानके आणि सूचनाही ठरवतील. या संपूर्ण घटनाक्रमाशी संबंधित सूत्रांनुसार, VIPL च्या 2,000 कोटींहून अधिक थकीत कर्जाच्या निराकरणासाठी SBI Caps योग्य आणि पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब करेल. यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

275 रुपयांपर्यंत गेला होता भाव - 
रिलायन्स पॉवरच्या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर 275 रुपयांपर्यंत गेला होता. हा शेअर या पातळीवर 2008 मध्ये पोहोचला होता. यानुसार, या शेअरमध्ये 95 टक्क्यांची घसरण झाली आहे. YTD मध्ये हा शेअर 4.08 टक्क्यांनी घसरला आहे. हा शेअर पाच वर्षांत 55.94 टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांतील  9.05 या निचांकावर आणि 24.95 या उच्चांकावर पोहोचला आहे.  रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 5,285.32 कोटी रुपये आहे.

Web Title: share market Reliance group stock reliance power share huge down 95 percent heavy debt in firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.