Join us  

Relianceच्या गुंतवणूकदारांची बंपर लॉटरी; एका आठवड्यात 45000 कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 2:11 PM

BSE वर सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी रिलायन्सला सर्वाधिक फायदा झाला आहे.

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या  (Reliance Industries Limited) शेअर होल्डर्ससाठी मागचा आठवडा अतिशय चांगला ठरला आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या आठवडाभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली. BSE वर सूचीबद्ध टॉप-10 (Top-10 Firms) कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) रु. 1,33,707.42 कोटींनी वाढले आहे. यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला.

या सात कंपन्या नफ्यात शेअर बाजारातील टॉप-10 कंपन्यांपैकी सात नफ्यात आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक (HDFC), इन्फोसिस (Infosys), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आणि ITC यांचा या यादीत समावेश आहे. तर, ICICI बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि भारती एअरटेल यांचे बाजार भांडवल घटले आहे.

रिलायन्सचे गुंतवणूकदार खूशगेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मार्केट कॅप (MCap) 44,956.5 कोटी रुपयांनी वाढले. या तेजीमुळे कंपनीचे बाजारमूल्य 17,53,888.92 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 22,139.15 कोटी रुपये कमावून दिले. बँकेचा एमकॅप 8,34,517.67 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

SBIसह या कंपन्यांची मोठी कामगिरीरिलायन्स आणि एचडीएफसी बँक व्यतिरिक्त, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) 20,526.61 कोटी रुपयांनी वाढून 5,29,898.82 कोटी रुपये, टीसीएस 19,521.04 कोटी रुपयांनी वाढून 11,76,860.69 कोटी रुपये, एचडीएफसी 16,156.049.43 कोटी रुपयांनी वाढले. ITC चे MCap Rs 9,861.07 कोटींनी वाढून Rs 4,38,538.73 कोटी झाले आहे. तर, आयटी दिग्गज इन्फोसिसचे बाजार मूल्य 547.01 कोटी रुपयांनी वाढून 6,37,023.14 कोटी रुपये झाले आहे.

या तीन कंपन्यांचे अनेक कोटी बुडाले

टॉप-10 मध्ये सामील असलेल्या तीन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. यापैकी आयसीआयसीआय बँकेचे एम-कॅप 1,518.27 कोटी रुपयांनी घसरून 6,31,314.49 कोटी रुपयांवर आले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे बाजार मूल्य 1,186.55 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,92,132.24 कोटी रुपये झाले. तोट्याततील तिसरी कंपनी भारती एअरटेल होती. त्यांचा एमकॅप 222.53 कोटी रुपयांनी कमी होऊन 4,54,182.23 कोटी रुपये झाला.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररिलायन्स