Share Market: आयर्न आणि स्टील प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या एका कंपनीने गेल्या काही वर्षात गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे नाव एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड (Apl Apollo Tubes) आहे. गेल्या गेल्या 10 वर्षांत कंपनीचे शेअर्स 15 रुपयांवरून 1000 रुपयांवर गेले आहेत. APL Apollo Tubes Ltd च्या शेअर्सनी या कालावधीत 6000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले. कंपनीचे शेअर्स सध्या 4 ऑगस्ट 2022 रोजी BSE वर 1052.75 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
1 लाखाचे झाले 65 लाख
3 ऑगस्ट 2012 रोजी APL Apollo Tubes चे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 15.31 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 4 ऑगस्ट 2022 रोजी बीएसईवर 1052.75 रुपयांवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर सध्या हे पैसे 67.82 लाख रुपये झाले असते. APL Apollo Tubes शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 742.50 आहे. तर, 52 आठवड्यांची उच्चांक 1113.65 रुपये आहे.
5 वर्षांत 500% पेक्षा जास्त परतावा
APL Apollo Tubes Limited च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात जवळपास 560 टक्के परतावा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 157.69 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स 4 ऑगस्ट रोजी बीएसईवर 1052.75 रुपयांच्या पातळीवर आहेत. APL Apollo Tubes च्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 23% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 59.39 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. एप्रिल-जून 2022 तिमाहीत कंपनीचा महसूल 2407.01 कोटी रुपये आहे.
डिस्केलमर: वरील माहिती कंपनीच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीच्या आधारे आहे. आम्ही गुंतवणुकीचा कुठलाही सल्ला देत नाही आहोत, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ्जांचा सल्ला घ्या.