Join us  

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, बँक निफ्टी जवळपास 2% घसरला, पॉवर ग्रिड 3% वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 6:53 PM

BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या कमजोरीसह 71428 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 212 अंकांनी घसरून 21718 च्या पातळीवर बंद झाला.

गुरुवारी शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडिया, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, हिंदाल्को, टीसीएस आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या समभागांनी वाढ नोंदवली, तर आयटीसी, कोटक बँक, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, नेस्ले, आयशर मोटर्स आणि आयसीआयसीआय या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने गुरुवारी ₹700 चा स्तर गाठला.

Gold Silver Price Today: आनंदाची बातमी! सोन्या चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर

गुरुवारी एलआयसीच्या शेअर्समध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती भारतीय शेअर बाजारातील चौथी सर्वात मोठी कंपनी ठरली. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 723 अंकांनी घसरला आणि 71428 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 212 अंकांनी घसरून 21718 च्या पातळीवर बंद झाला.

₹५७५ वर जाऊ शकतो टाटांचा 'हा' शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर

तुम्ही टाटा ग्रुपच्या कोणत्याही शेअरवर नशीब आजमावण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही इंडियन हॉटेल्सच्या शेअरवर लक्ष देऊ शकता. टाटा समूहाचा हा शेअर गुरुवारी बीएसईवर 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 530.40 रुपयांवर पोहोचला. हा या कंपनीचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर आहे. याआधी बुधवारी या शेअरमध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली आणि हा शेअर 524.80 रुपयांवर बंद झाला. येथे, ब्रोकरेज टाटा समूहाच्या या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत, तसंच त्यांनी यात गुंतवणूकीचा सल्ला दिलाय.

काय आहे टार्गेट प्राईज?HSBC ने इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सवर 575 रुपये टार्गेट प्राईज दिली आहे आणि त्यावर बाय रेटिंग दिलं आहे. तर दुसरीकडे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्यांची बॅलन्स शीट अतिशय मजबूत आहे. जेएम फायनान्शियलने इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सवर 555 रुपये टार्गेट प्राईज ठेवली आहे. ब्रोकरेज फर्मनं सांगितले की, “आयएचसीएलचे पॅन इंडिया कव्हरेज, सर्व ग्राहक विभागांमध्ये विस्तृत उपस्थिती, उत्कृष्ट ब्रँड्स आणि भांडवली वाटपावर फोकस यामुळे सकारात्मक परिणाम होत आहेत,” असं ब्रोकरेज फर्मनं म्हटलंय.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार