Join us

3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 4:17 PM

हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे.

शेअर बाजारातील मामाअर्थची (Mamaearth) पॅरेंट कंपनी होनासा कंझ्युमरचा आयपीओ 31 ऑक्टोबरला खुला होत आहे. या कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 308-324 रुपयांना आहे. स्नॅपडीलचे को-फाउंडर्स कुणाल बहल आणि रोहित बंसल, शिल्पा शेट्टी, मॅरिकोचे ऋषभ हर्ष मारीवाला यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी या कंपनीत पैसा लावलेला आहे. 

आता हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे. अर्थात या कंपनीतील त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य बऱ्याच पटीने वाढले आहे.

स्नॅपडीलच्या को-फाउंडर्सना 100 पटहून अधिक परतावा - स्नॅपडीलचे को-फाउंडर्स कुणाल बहल आणि रोहित बंसल यांनी 2018 मध्ये होनासा कंझ्यूमर (Honasa Consumer) मध्ये गुंतवला होता. त्यांनी केवळ 3.21 रुपये प्रति शेअरने नुसार कंपनीचे शेअर खरेदी केले होते. आता कुणाल आणि रोहित दोघेही कंपनीचे 1,193,250 शेअर विकत आहेत. कुणाल आणि रोहित यांना 100 परटहून अधिक परतावा मिळत आहे. होनासा कंज्यूमरचे आयपीओचे सब्सक्रिशन 2 नोव्हेंबर 2023 बंद होईल.

याशिवाय, मॅरिकोचे ऋषभ हर्ष मारीवाला यांनी 6.05 रुपये प्रति शेअर या अॅव्हरेज कॉस्टवर मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कंझ्यूमरच्या शेअरची खरेदी केली होती. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक