Share Market : शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची असते, पण कधी-कधी असा एखादा शेअर हाती लागतो, जो चांगली कमाई करुन देतो. सोलर ग्लास बनवणारी कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्स (Borosil Renewables) अशाच कंपन्यांपैकी एक आहे. या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. हे शेअर्स गेल्या 20 वर्षांत अवघ्या 13 पैशांवरुन 500 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
म्हणजेच, बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी या कालावधीत तब्बल 384000% पेक्षाही जास्तीचा परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 667.40 रुपये आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, म्हणजेच शुक्रवारी(14 जून 2024) कंपनीचे शेअर्स 500.85 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 20 वर्षांत बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्समध्ये 384435% ची बंपर वाढ झाली आहे.
एखाद्या व्यक्तीने 24 जून 2004 रोजी बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला आता तब्बल 38.45 कोटी रुपये मिळतील. यामध्ये बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा समावेश केलेला नाही. दरम्यान, 13 जून 2014 रोजी कंपनीचे शेअर्स 14.41 रुपयांवर होते, तर 14 जून 2024 रोजी 499.90 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच, गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 181% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)