Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! 15 रुपयांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशिबच बदललं; दिला एवढा परतावा, की 1 लाखाचे झाले 65 लाख

जबरदस्त! 15 रुपयांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशिबच बदललं; दिला एवढा परतावा, की 1 लाखाचे झाले 65 लाख

लखंड आणि स्टील प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या या कंपनीने गेल्या काही दिवसांता आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:05 PM2022-08-04T17:05:29+5:302022-08-04T17:06:15+5:30

लखंड आणि स्टील प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या या कंपनीने गेल्या काही दिवसांता आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे.

Share Market Stock market apl apollo tubes shares turned 1 lakh rupee investment into more than 65 lakh rupee | जबरदस्त! 15 रुपयांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशिबच बदललं; दिला एवढा परतावा, की 1 लाखाचे झाले 65 लाख

जबरदस्त! 15 रुपयांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशिबच बदललं; दिला एवढा परतावा, की 1 लाखाचे झाले 65 लाख

लखंड आणि स्टील प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या या कंपनीने गेल्या काही दिवसांता आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड (Apl Apollo Tubes) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचा शेअर गेल्या 10 वर्षांत 15 रुपयांवरून थेट 1000 रुपयांवर पोहोचला आहे. एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेडच्या शेअर्सनी या कालावधीत तब्बल 6000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर 4 ऑगस्ट 2022 रोजी बीएसईवर 1052.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

1 लाख रुपयांचे झाले 65 लाख रुपये -
एपीएल अपोलो ट्यूब्सचा शेअर 3 ऑगस्ट 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 15.31 रुपयांच्या पातळीवर होता. 4 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचा शेअर BSE वर रु. 1052.75 वर पोहोचला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याचे 67.82 लाख रुपये झाले असते. या शेयर्सची 52 आठवड्यांतील लो-लेव्हल 742.50 रुपये एवढी आहे. तर, 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 1113.65 रुपये एवढी आहे.

5 वर्षांत दिला 500 टक्क्यांहून अधिक परतावा -  
एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत 560 टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 157.69 रुपयांना होता. आता 4 ऑगस्टला तो बीएसईवर 1052.75 रुपयांना आहे. एपीएल अपोलो ट्यूब्सच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात 23 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला होता. जून 2022 तिमाहीत कंपनीला 59.39 कोटी एवढा नफा झाला आहे. तर एप्रिल-जून 2022 तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 2407.01 कोटी रुपये एवढा होता.

Web Title: Share Market Stock market apl apollo tubes shares turned 1 lakh rupee investment into more than 65 lakh rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.