Brightcom Groupचा शेअर गेल्या 20 जुलै 2018 रोजी 1.78 रुपयांना होता. तो आता 50.50 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 3 वर्षांत या शेअरने 2905.95 टक्के एवढा परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये जर कुणी 3 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे एक लाख रुपयांचे 30 लाख रुपये झाले असते.
15 दिवसांत 70 टक्क्यांचा परतावा
सध्या शेअर बाजारात चढ उतार सुरू असतानाही गेल्या 15 दिवसांत Brightcom Group च्या शेअर्सनी जवळपास 70 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा स्टक केवळ 22 दिवसांत 29.90 वरून 50.50 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 15 दिवसांत या स्टॉकने 68.90 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र, जर गेल्या एक वर्षांचा विचार केला तर, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 140.48 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
अधिक ट्रेड होणाऱ्या securities मध्ये ब्राइटकॉम ग्रुपही -
नॅशनल स्टॉक एक्सचेन्जमध्ये बुधवारी सर्वाधिक ट्रेड होणाऱ्या securities मध्ये ब्राइटकॉम ग्रुपचाही समावेश आहे. यात आरआयएल (134.45 कोटी रुपये), एसबीआय (75.32 कोटी रुपये), टीसीएस (68.49 कोटी रुपये), वेदांत (58.29 कोटी रुपये), इंफोसिस (49.95 कोटी रुपये), एचडीएफसी बँक (41.93 कोटी रुपये) ), लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज एनएसई 7.92% लिमिटेड (38.85 कोटी रुपये), आयसीआयसीआय बँक (38.24 कोटी रुपये), ब्राइटकॉम ग्रुप (37.20 कोटी रुपये) आणि पॉलिसी बाजार (32.93 कोटी रुपये) सारख्या स्टक्सचा समावेश आहे.