Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव!

बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव!

या शेअरवर एक्सपर्टदेखील बुलिश आहेत. एका ब्रोकरेजने नुकतेच या शेअरसाठी 1100 रुपये एवढे टारगेट प्राइस ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:12 PM2023-12-20T21:12:12+5:302023-12-20T21:12:30+5:30

या शेअरवर एक्सपर्टदेखील बुलिश आहेत. एका ब्रोकरेजने नुकतेच या शेअरसाठी 1100 रुपये एवढे टारगेट प्राइस ठेवले आहे.

Share market tata consumer share top gainers amid market crash today may price touch 1100 rs | बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव!

बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹1100 पर्यंत जाऊ शकतो भाव!

शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात बुधवारी मोठी घसरण बघायला मिळाली. या घसरणीतही काही शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमरचा. या शेअरवर एक्सपर्टदेखील बुलिश आहेत. एका ब्रोकरेजने नुकतेच या शेअरसाठी 1100 रुपये एवढे टारगेट प्राइस ठेवले आहे.

शेअरची किंमत -
निफ्टी-50 वर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचा शेअर हिरव्या निशाणावर बंद झाला. हा शेअर 1.02% ने वाढून 976.05 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, बीएसईवर टाटा कंझ्युमरचा शेअर 1.02% ने वाढून 976.15 रुपयांवर बंद झाला. महत्वाचे म्हणजे, हा शेअर आज 1009.75 रुपयांच्या 52- आठवड्यांच्या उच्चांकावरही पोहोचला. हे जवळपास 3 टक्क्यांहून अधिकची तेजी दर्शवते. 

टार्गेट प्राइस म्हणजे काय?
देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांच्या मते, टाटाच्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सची टार्गेट प्राइस 1110 रुपये एवढी आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे, आम्ही FY23-26 मध्ये 10%/15%/22% चा महसूल/EBITDA/PAT CAGR ची आशा करतो. यामुळे, टाटाच्या या शेअरसाठी 1110 रुपयांचे टार्गेट प्राइस देत आहोत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share market tata consumer share top gainers amid market crash today may price touch 1100 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.