Join us  

घड्याळ आणि ज्वेलरी विकून टाटा समूहाच्या या कंपनीनं कमावला तगडा नफा, रॉकेट बनला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 5:59 PM

गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील 835 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा 9.7 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीच्या 756 कोटी रुपयांच्य नफ्याच्या तुलनेत 21.16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

टाटा समूहाच्या टायटन कंपनी लिमिटेडने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केला आहे. यानुसार या तिमाहीत कंपनीला तब्बल 916 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील 835 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा 9.7 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीच्या 756 कोटी रुपयांच्य नफ्याच्या तुलनेत 21.16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

कंपनीच्या एकूण महसुलासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 12,529 कोटी रुपये आहे, जे गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या 9,163 कोटी रुपयांच्या तुलनेत 36.73 टक्के अधिक आहे. गहेल्या तिमाहीतील 11,897 कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीचा महसूल 5.31 टक्क्यांनी वाढला आहे. EBIDTA मार्जिन एक वर्षापूर्वीच्या कालावधीत 14.1 टक्क्यांच्या तुलनेत 11.6 टक्के होता.शेअरने घेतली उसळी -  टायटनच्या शेअर संदर्भात बोलायचे झाल्यास, ट्रेडिंगदरम्यान या शेअरने 3 टक्क्यांची उसळी घेतली आहे. ट्रेडिंगच्या अखेरीस शेअरची किंमत 3272.55 रुपये होती.  हे एका दिवस आधीच्या तुलनेत 2.23% ची वाढ दर्शवते.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक