Join us  

6 महिन्यांत एक लाख टक्के रिटर्न! 35 पैशांच्या या शेअरनं केली कमाल, 1 लाखाचे झाले 10 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 8:07 PM

हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला. सहा महिन्यांनंतर आता या शेअरची किंमत 376.45 रुपयांवर पोहोचली आहे.

सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या ( Sel Manufacturing Company Ltd) शेअर्सनी कमाल केली आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत तब्बल एक लाख टक्क्यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे (Multibagger stock return). खरे तर, गेल्या काही सत्रांपासून कंपनीचे शेअर्स सातत्याने अपर सर्किटवर दिसत आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सात पट वाढ झाली आहे. आज 8 मार्च रोजी कंपनीचे शेअर NSE वर 4.99 टक्क्यांनी वाढून 376.45 रुपयांवर पोहोचले.

6 महिन्यांत तब्बल 107,457.14 टक्के रिटर्न -हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला. सहा महिन्यांनंतर आता या शेअरची किंमत 376.45 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 107,457.14 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. यावर्षी 2022 मध्ये हा शेअर 44.40 रुपयांनी (3 जानेवारी 2022) वाढून 376.45 रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान या शेअरने 747.86 टक्क्यांचा परतावा दिला. केवळ एकाच महिन्यात या शेअरने 152.14 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 

गुंतरवणूकदारांना 10 कोटींहून अधिकचा फायदा - जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा मिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 35 पैसे प्रति शेअर, या हिशेबाने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची ही रक्कम आज 10 कोटींहून अधिक झाली असती. तसेच, या वर्षी एखाद्या गुंतवणूकदाराने 44.40 रुपये प्रति शेअर दराने एक लाख रुपये लावले असते. तर आज ही रक्कम 8.45 लाख रुपये एवढी झाली असती. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक