Join us

शेअर बाजारात मोठी वाढ; Sensex 80664 वर बंद, मार्केट कॅप 455 लाख कोटी पार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 4:19 PM

Share Market Today: मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी; ONGC, SBI Life, Shriram Fin ठरले टॉप गेनर्स.

Stock Market Closing On 15 July 2024 : आठवड्याचा पहिला दिवस(15 जुलै 2024) शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने पहिल्यांदाच 81.75 अंकांच्या वाढीसह 24600 चा टप्पा ओलांडला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 145.32 अंकांच्या वाढीसह 80,664 वर बंद झाला. आजच्या सत्रात ऑटो, बँकिंग, मेटल, फार्मा आणि एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. 

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावरशेअर बाजारातील आजच्या वाढीमुळे BSE वर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप रु. 455.12 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. हे मागील ट्रेडिंग सत्रात 452.38 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.74 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात  ONGC 5.8%, Shriram Fin 3.05% SBI 2.55%, NTPC 2.23%, अल्ट्राटेक सिमेंट 1.98%, महिंद्रा अँड महिंद्रा 0.96%, बजाज फायनान्स 0.82%, टाटा मोटर्स 0.78%, मारुती सुझुकी 0.68%, IndusInd Bank 0.6%, KoTC Bank 0.5%, Kodra Ind 0.6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, एशियन पेंट्स 1.44 %, टाटा स्टील 1.13 %, ॲक्सिस बँक 0.76 %, टेक महिंद्रा 0.43 %, टीसीएस 0.40 % घसरणीसह बंद झाले.

सेक्टरॉल अपडेटआजच्या व्यवहारात फार्मा, एनर्जी, ऑटो, बँकिंग, मेटल, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांतील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहारात मिडकॅप निर्देशांकाने पुन्हा उच्चांक गाठला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 18 वाढीसह बंद झाले, तर 12 तोट्यात गेले.  बीएसईच्या आकडेवारीनुसार, 4168 शेअर्सपैकी 2038 वाढीसह आणि 2003 तोट्यासह बंद झाले.

(टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक