Join us

शेअर बाजारात पुन्हा घसरण, नफावसूलीमुळे गुंतवणूकदारांचे ₹१.१ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 5:14 PM

शेअर मार्केट गेल्या ५ दिवसांपासून तेजीत होते, पण आता याला ब्रेक लागला आहे.

मुंबई- मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केट तेजीत सुरू होते. आज याला ब्रेक लागला असून बीएसई सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २२,०५० च्या खाली घसरला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे १.१ लाख कोटी रुपये बुडाले. आज फक्त धातू आणि तेल आणि वायू समभागांच्या निर्देशांकात वाढ दिसून आली. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड मध्ये बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये विक्री झाली.

दिवसाच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स १९९.१६ अंकांनी किंवा ०.२७% घसरून ७३,३२७.९४ वर बंद झाला. तर एनएसई (NSE) चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ६५.१५ अंकांनी घसरला आणि २२,०३२.३० च्या पातळीवर बंद झाला.

कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज १६ जानेवारी रोजी ३७४.९९ लाख कोटी रुपयांवर आले, हे सोमवारी १५ जानेवारीला ३७६.०९ लाख कोटी रुपये होते. या पद्धतीने बीएसई (BSE) मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १.१ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. 

बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी ११ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १.७०% वाढ झाली. यानंतर टायटन, ITC, मारुती सुझुकी आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) चे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि १.०३% ते १.५४% च्या वाढीसह बंद झाले.

तर उर्वरित १९ सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्येही विप्रोचे शेअर्स १.९३ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर एचसीएल टेक, एनटीपीसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग १.४३% ते १.८७% घसरून रेडमध्ये बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय