Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Live: शेअर बाजारात तेजीची लाट! सेन्सेक्सची ५८ हजारांवर झेप; गुंतवणूकदार मालामाल

Share Market Live: शेअर बाजारात तेजीची लाट! सेन्सेक्सची ५८ हजारांवर झेप; गुंतवणूकदार मालामाल

Share Market Live: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आनंदाचं वातावरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उसळी घेताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 10:49 AM2021-09-03T10:49:48+5:302021-09-03T10:50:30+5:30

Share Market Live: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आनंदाचं वातावरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उसळी घेताना दिसत आहेत.

share market today sensex crosses 58 thousand nifty record high bse nse stock rise | Share Market Live: शेअर बाजारात तेजीची लाट! सेन्सेक्सची ५८ हजारांवर झेप; गुंतवणूकदार मालामाल

Share Market Live: शेअर बाजारात तेजीची लाट! सेन्सेक्सची ५८ हजारांवर झेप; गुंतवणूकदार मालामाल

Share Market Live: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आनंदाचं वातावरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उसळी घेताना दिसत आहेत. आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सनं नव्या उच्चांकाची नोंद करत पहिल्यांदाच ५८ हजारांचा आकडा ओलांडला आहे. सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी सेन्सेक्स २६३ अकांच्या वाढीसह ५८,११५.६९ वर पोहोचला आहे. 

आज सकाळी बाजार सुरू होताच १३१ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्सनं ५७,९८३.४५ हजारांवर व्यवहाराला सुरुवात झाली. तर निफ्टी देखील २८ अकांच्या वाढीसह १७,२६२ अंकांवर सकारात्मक सुरुवात केली. थोड्याच वेळात निफ्टी ७७ अंकांच्या वाढीसह रेकॉर्ड ब्रेक १७,३११.९५ अंकांवर पोहोचला. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सकारात्मक वातावरण
आंतरराष्ट्रीय बाजारातही सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. आशियातील बाजारात मजबूती दिसत आहे. पण SGX NIFTY आणि DOW FUTURES सध्या स्थिर आहे. दुसरीकडे अमेरिकेत काल रेकॉर्ड ब्रेक उसळी घेत S&P 500 आणि NASDAQ बंद झाले होते.  अमेरिकेकडून आज ऑगस्ट महिन्याचा जॉब रिपोर्ट प्रकाशित केला जाणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 

Web Title: share market today sensex crosses 58 thousand nifty record high bse nse stock rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.