Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

Share Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:51 PM2024-09-05T16:51:47+5:302024-09-05T16:52:05+5:30

Share Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला.

Share Market Today: Sensex-Nifty close lower; Buy in mid-cap and small-cap stocks | सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

Stock Market Closing On 5 September 2024 : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 151 अंकांनी घसरुन 82,201 वर आला, तर निफ्टी 54 अंकांनी घसरुन 25,145 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ झाली. बँकिंग, आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये मात्र खरेदी दिसून आली. 

सेक्टोरीअल अपडेट
आजच्या व्यवहारात ग्राहकोपयोगी वस्तू, आयटी, बँकिंग, धातू आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली. तर ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, रिअल इस्टेट, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले. आजच्या सत्रात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये वाढ झाली.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
सेन्सेक्समधील 30 पैकी 9 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 21 शेअर्सना तोटा सहन करावा लागला. 50 निफ्टी शेअर्सपैकी 18 वाढीसह आणि 32 तोट्यासह बंद झाले. तेजीच्या शेअर्समध्ये टायटन 3.11 टक्के, आयटीसी 0.89 टक्के, इन्फोसिस 0.49 टक्के, एचसीएल टेक 0.33 टक्के, टाटा स्टील 0.30 टक्के, एसबीआय 0.26 टक्के, एचडीएफसी बँक 0.20 टक्के, एशियन पेंट्स 0.16 टक्के, ॲक्सिस बँक 0.4 टक्के, टीसीएस 0.4 टक्के तेजीसह बंद आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये रिलायन्स 1.41 टक्के, टाटा मोटर्स 1.08 टक्के, नेस्ले 1 टक्के, भारती एअरटेल 0.96 टक्के, एलअँडटी 0.80 टक्के, बजाज फायनान्स 0.75 टक्क्यांनी घसरले.

मार्केट कॅपमध्ये वाढ
भारतीय शेअर बाजारात घसरण झाली असली तरी, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील खरेदीमुळे बीएसईवर सूचीबद्ध एकूण शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध स्टॉक्स 465.66 लाख कोटींवर बंद झाले, जे मागील सत्रात 465.13 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 52,000 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Share Market Today: Sensex-Nifty close lower; Buy in mid-cap and small-cap stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.