Stock Market Closing On 11 July 2024 : भारतीय शेअर बाजारात गुरुवारच्या(दि.11) सत्रात भराच चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरुन 700 हून अधिक अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 हून अधिक अंकांनी घसरला. पण, दिवसाच्या शेवटी बाजार फ्लॅट नोटवर बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 27 अंकांच्या किंचित घसरणीसह 79,897 अंकांवर, तर निफ्टी 8.50 टक्क्यांच्या घसरणीसह 24,315 अंकांवर बंद झाला.
सरकारी शेअर्समध्ये जोरदार वाढ
आजच्या सत्रात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ऑइल इंडिया 7.44 टक्के, एनएचपीसी 4.82 टक्के, हिंदुस्थान पेट्रोलियम 4.85 टक्के, आरईसी 2.53 टक्के, ओएनजीसी 2.21 टक्के, बीपीसीएल 2.08 टक्के, कोल इंडिया 1.90 टक्के, पॉवर फायनान्स 1.75 टक्के वाढीसह बंद झाले. तर, आयटीसी 1.64 टक्के, टाटा मोटर्स 1.52 टक्के, एशियन पेंट्स 0.93 टक्के आणि एसबीआय 0.88 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स 1.48 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.24 टक्के, NTPC 1.14 टक्के, पॉवर Gpid 0.95 टक्के आणि सन फार्मा 0.89 टक्क्यांनी घसरून बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये वाढ
शेअर बाजार सपाट असतानाही आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 451.29 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या सत्रात 450.05 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.24 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)