Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकिंग-मेटल्स-एनर्जी सेक्टरमध्ये जोरदार उसळी; BSE सेन्सेक्स 77,479 अंकांवर बंद...

बँकिंग-मेटल्स-एनर्जी सेक्टरमध्ये जोरदार उसळी; BSE सेन्सेक्स 77,479 अंकांवर बंद...

Share Market Today: बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 435.91 लाख कोटी रुपयांवर आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 05:09 PM2024-06-20T17:09:46+5:302024-06-20T17:10:02+5:30

Share Market Today: बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 435.91 लाख कोटी रुपयांवर आले.

Share Market Today: Strong rebound in banking-metals-energy sector; BSE Sensex closes at 77,479 points | बँकिंग-मेटल्स-एनर्जी सेक्टरमध्ये जोरदार उसळी; BSE सेन्सेक्स 77,479 अंकांवर बंद...

बँकिंग-मेटल्स-एनर्जी सेक्टरमध्ये जोरदार उसळी; BSE सेन्सेक्स 77,479 अंकांवर बंद...

Stock Market Closing On 20 June 2024 : बुधवारच्या घसरणीनंतर, गुरुवारी(दि.20) शेअर बाजाराने वेग पकडला. आजच्या सत्रात BSE सेन्सेक्स 141 अंकांच्या वाढीसह 77,479 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 51 अंकांच्या उसळीसह 23,567 अंकांवर बंद झाला.

आज बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी बँकेत दमदार वाढ झाली. याशिवाय मेटल, एनर्जी, रिअल इस्टेट, ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. तर ऑटो आणि फार्मा शेअर्स घसरले. आजच्या सत्रात बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 15 वाढीसह आणि 15 तोट्यासह बंद झाले. BSE वर एकूण 3976 शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यामध्ये 2295 वाढीसह बंद झाले तर 1554 तोट्यासह बंद झाले. 

मार्केट कॅपमध्ये वाढ
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 435.91 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 433.95 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.96 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

वाढणारा आणि घसरणारा शेअर
आजच्या व्यापारात JSW 1.67 टक्क्यांनी, टाटा स्टील 1.28 टक्क्यांनी, ICICI बँक 1.05 टक्क्यांनी, रिलायन्स 1 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा बँक 0.96 टक्क्यांनी, Axis बँक 0.95 टक्क्यांनी, Asian Paints 0.88 टक्क्यांनी वाढले. तर सन फार्मा 2.24 टक्कांनी, महिंद्रा अँड महिंद्रा 2.10, एनटीपीसी 1.26, एसबीआय 1.03, विप्रो 1.03, पॉवर ग्रीड 0.90 टक्के घसरुन बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Share Market Today: Strong rebound in banking-metals-energy sector; BSE Sensex closes at 77,479 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.