Share Market Upcoming IPO : मे महिन्यात शेअर बाजारात 'आयपीओं'चा (IPO) वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत. डिजिटल सेवा संस्था इंडेजीनचा आयपीओ ६ मे रोजी उघडणार आहे. आधार हाउसिंग फायनान्स व ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी टीबीओ टेकचा आयपीओ ८ मे रोजी उघडणार आहे.
का वाढले आयपीओ?
निवडणूक काळात आयपीओ कमी येतात. यंदा मात्र मागील ४ लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत ७ पट अधिक आयपीओ आलेत. गुंतवणूकदारांतील उत्साह, जबरदस्त जीडीपी वृद्धी दर आणि भारताबाबतचा सकारात्मक कल यामुळे यंदा निवडणूक काळात आयपीओ वाढले आहेत.
या महिन्यात 'हे' आयपीओ येणार
- गो डिजिट (३,५०० कोटी रुपये)
- आधार हाउसिंग फायनान्स (३००० कोटी रुपये)
- इंडेजिन (१८४१ कोटी रुपये)
- ऑफिस स्पेस सोल्यूशन्स (१००० कोटी रुपये)
- टीबीओ टेक (१००० कोटी रुपये)
- क्रोनॉक्स (१५० कोटी रुपये)
एसएमई आयपीओही दाखवतील जलवा
- विन्सोल इंजिनिअर्स: या एसएमई कंपनीचा २३.३६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे या काळात खुला असेल. याची इश्यू प्राइस ७१ ते ७५ रुपये आहे.
- स्लोन इन्फोसिस्टम्स : या कंपनीचा ११ कोटींचा आयपीओ ३ ते ७ मे दरम्यान खुला असेल. याची इश्यू प्राइस ७९ रुपये आहे.
- रीफ्रँक्री शेप्स : या कंपनीचा १८.६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. याची इश्यू प्राइस २७ ते ३१ रुपयांदरम्यान असेल.
- फाइनलिस्टिंग्ज टेक: हा १३.५३ कोटींचा आयपीओ ७ मे ते ९ मे दरम्यान चालेल. इश्यू प्राइस १२३ रुपये असेल.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)