Share Market Update : मंगळवारी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात विक्री अधिक झाल्यानं सेन्सेक्स ७०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला. मंगळवारी शेअर बाजाराचा निर्देशांत ७०३ अंकांनी घसरून ५६४६३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २१५ अंकांची घसरण होऊन तो १६९५८ अंकांवर बंद झाला. आजा प्रमुख ३० शेअर्समध्ये केवळ रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याशिवाय अन्य सर्व २८ शेअर घसरणीसह बंद झाले. एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
आयटी, एफएमजीसी, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. एचडीएफसी बँकेचा शेअर सलग नवव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. तर दुसरीकडे रिलायन्सच्या शेअरमध्ये मंगळवारी ३.१६ टक्क्यांची वाढ दिसून आली. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३ टक्के, एफएमजीसी २.८२ टक्के, तर रियल्टी २.४७ टक्के, फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण नोंदवण्यात आली.
दोन दिवसांत मोठं नुकसानसोमवारच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती घसरून २६९.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर मंगळवारी गुंतवणूकदारांना ४ लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं. गेल्या आठवड्यात बीएसईमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्यांचं मार्केट कॅप २७२.०३ कोटी रूपये होतं. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना ६.६५ लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं.
रुपया घसरलामंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी घसरला आणि तो ७६.४८ रुपयांच्या स्तरावर बंद झाला. दरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळेच डॉलर मजबूत झाला. सध्या डॉलर इंडेक्स ०.११ टक्क्यांच्या तेजीसह १०१ च्या जवळ आहे. तर कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट होऊन १११ डॉलर्सच्या स्तरावर पोहोचले आहे.