कोरोना काळात शेअर बाजाराने इतिहास रचला आहे. आज सकाळी 338 अंकांची उसळी घेऊन बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्सने 60000 चा टप्पा ओलांडला आहे. एवढी मोठा पल्ला गाठण्याची शेअर बाजाराची ही पहिलीच वेळ आहे. (Sensex Tops 60,000 For First Time, Nifty Above 17,900.)
सध्या शेअरबाजार 288 अंकांनी वधारून 60,173 वर ट्रेड करत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीदेखील 100 अंकांनी उसळला असून रेकॉर्ड स्तरावर म्हणजेच 17,923.35 वर ट्रेड करत आहे.
Sensex rises by 375 points at 60,260, Nifty jumps 106 points to trade at 17,929 as market scale record highs pic.twitter.com/IljgsnX7Tz
— ANI (@ANI) September 24, 2021
कोरोना काळात अन्य क्षेत्रांना संकटाचे दिवस आलेले असताना सोने आणि शेअर बाजाराचा सुगीचे दिवस आले आहेत. सोन्याने देखील सर्वकालिन टप्पा गाठला होता. तर गेल्या वर्षीच शेअर बाजाराने देखील 50000 चा टप्पा गाठला होता.