Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ola electric च्या शेअरनं पकडला फुल स्पीड; एक्सपर्ट म्हणाले ₹१३७ पर्यंत जाणार किंमत

Ola electric च्या शेअरनं पकडला फुल स्पीड; एक्सपर्ट म्हणाले ₹१३७ पर्यंत जाणार किंमत

Ola electric mobility share: शेअर बाजारातील वादळी तेजीदरम्यान मंगळवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला हा शेअर ९ टक्क्यांनी वधारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:21 PM2024-12-03T15:21:07+5:302024-12-03T15:21:07+5:30

Ola electric mobility share: शेअर बाजारातील वादळी तेजीदरम्यान मंगळवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला हा शेअर ९ टक्क्यांनी वधारला.

Share of Ola electric share rally huge profit investors Experts say the price will go up to rs 137 | Ola electric च्या शेअरनं पकडला फुल स्पीड; एक्सपर्ट म्हणाले ₹१३७ पर्यंत जाणार किंमत

Ola electric च्या शेअरनं पकडला फुल स्पीड; एक्सपर्ट म्हणाले ₹१३७ पर्यंत जाणार किंमत

Ola electric mobility share: शेअर बाजारातील वादळी तेजीदरम्यान मंगळवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला हा शेअर ९ टक्क्यांनी वधारला. या कालावधीत शेअरचा इंट्राडे उच्चांक १०१.४ रुपये होता. ४ ऑक्टोबरनंतर प्रथमच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरनं इंट्राडे ट्रेडिंगमध्ये १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर गेल्या आठ ट्रेडिंग सेशन्समधील वाढीचा हा सातवा दिवस आहे.

ब्लॉक डील तपशील

ओला इलेक्ट्रिकने नुकतीच ब्लॉक डील केली. या डीलमध्ये एकूण १.७ कोटी शेअर्सची देवाणघेवाण झाली आणि एकूण व्यवहारमूल्य १६४ कोटी रुपये इतकं होतं. सरासरी ९५ रुपयांच्या किमतीत हा व्यवहार झाला.

कंपनीचा प्लॅन काय?

ओला इलेक्ट्रिकनं २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या कंपनीच्या मालकीच्या स्टोअर्सची संख्या चार पटीनं वाढवून ४,००० करण्याची योजना आखली आहे. कंपनीकडे सध्या ८०० स्टोअर्स आहेत आणि आता ३,२०० हून अधिक नवीन स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. सर्व नवीन स्टोअर्समध्ये सर्व्हिसची सुविधा देखील असेल, ज्यामुळे देशभरात कंपनीचे सर्व्हिस नेटवर्क मजबूत होईल. नेटवर्क पार्टनर प्रोग्रामअंतर्गत २०२५ च्या अखेरपर्यंत विक्री आणि सेवांमध्ये १०,००० भागीदारांना जोडण्याची कंपनीची योजना आहे.

ब्रोकरेज बुलिश

परदेशी ब्रोकरेज कंपन्यांनी ओला इलेक्ट्रिकबाबत सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे. नुकतेच गोल्डमन सॅक्सनं या शेअरला १३७ रुपयांचे टार्गेट दिलंय. ब्रोकरेज ओलाची बाजार वाढीची क्षमता आणि सेवा नेटवर्कमधील तफावत दूर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसंच बोफाचे टार्गेट १२० रुपये आहे. याशिवाय एचएसबीसीनं यासाठी ११० रुपयांचं टार्गेट ठेवलंय. ब्रोकरेजनं प्रॉडक्ट लाँचिंग आणि बॅटरीच्या अॅडव्हान्समेंटमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Share of Ola electric share rally huge profit investors Experts say the price will go up to rs 137

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.