Lokmat Money > बिझनेस न्यूज > २१०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते HDFC च्या शेअरची किंमत, ५० टक्क्यांची येऊ शकते तेजी

२१०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते HDFC च्या शेअरची किंमत, ५० टक्क्यांची येऊ शकते तेजी

एचडीएफसी बँकेचे शेअर्स सतत दबावाखाली आहेत. परंतु यात वाढ होऊ शकते असं मत ब्रोकरेज हाऊसनं व्यक्त केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:47 AM2024-02-16T11:47:37+5:302024-02-16T11:48:07+5:30

एचडीएफसी बँकेचे शेअर्स सतत दबावाखाली आहेत. परंतु यात वाढ होऊ शकते असं मत ब्रोकरेज हाऊसनं व्यक्त केलंय.

Share price of HDFC bank may go beyond Rs 2100 may rise by 50 percent share market | २१०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते HDFC च्या शेअरची किंमत, ५० टक्क्यांची येऊ शकते तेजी

२१०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते HDFC च्या शेअरची किंमत, ५० टक्क्यांची येऊ शकते तेजी

HDFC Bank : एचडीएफसी बँकेचे शेअर्स सतत दबावाखाली आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर्स लवकरच ट्रॅक बदलू शकतात आणि चांगली वाढ दिसू शकते असं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं एचडीएफसी बँकेच्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसने बँकेच्या शेअर्ससाठी 2110 रुपयांची टार्गेट प्राईज दिलीये. म्हणजेच एचडीएफसी बँकेचे शेअर्स सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 50 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. 
 

मॉर्गन स्टॅनलीचा हा बुलिश कॉल मॅनेजमेंटकडून आलेल्या एका वक्तव्यानंतर आला आहे. HDFC बँकेच्या व्यवस्थापनानं म्हटलं की विलीनीकरणानंतर, 31 डिसेंबर 2023 पर्यंत वार्षिक आधारावर स्टेबल आणि हेल्दी डबल डिजीट ग्रोथ झाली आहे. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीये. 
 

वर्षभरात 15 टक्क्यांची घसरण
 

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. 16 फेब्रुवारी 2023 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1664.75 रुपयांवर होते. 16 फेब्रुवारी 2024 रोजी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स 1411.80 रुपयांवर व्यवहार करत आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 17 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1757.80 रुपये आहे. बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1363.45 रुपये आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Share price of HDFC bank may go beyond Rs 2100 may rise by 50 percent share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.