MTNL Share :शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे मागील काही काळात खुप घसरले, पण आता त्यांनी पुन्हा वेग पकडला आहे. अशाच शेअर्समध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) चे शेअर्सदेखील आहेत. 97% पेक्षा जास्त घसरल्यानंतर आता MTNL च्या शेअर्सनी मंगळवारी(दि.16), जानेवारी 2011 नंतर पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 13 टक्क्यांहून अधिक वाढून 55.67 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे गुंतवणुकदार कंपनीच्या शेअर्सवर उड्या मारत आहेत.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, सरकार MTNL चा सर्व व्यवसाय BSNL कडे सोपवणार आहे. या रिपोर्ट्समुळे गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्समध्ये रस दाखवत आहेत. महिनाभरात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, MTNL चे शेअर्स 4 दिवसात 31% वाढले आहेत.
MTNL चे शेअर्स 97% पेक्षा जास्त घसरले
कपंनीचे शेअर्स 10 मार्च 2000 रोजी 320 रुपयांवर होते. तर, 19 जुलै 2019 रोजी हे 97 टक्क्यांहून अधिक घसरुन 7.04 रुपयांवर आले. मात्र, गेल्या 5 वर्षांत MTNL च्या शेअर्समध्ये 660% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, गेल्या एका वर्षात 175% पेक्षा जास्त वाढले आहेत. 17 जुलै 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 19.41 रुपयांवर होते, आता 16 जुलै 2024 रोजी 55.67 रुपयांवर पोहोचले आहेत. याशिवाय, MTNL चे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)