नवी दिल्ली-
शेअर बाजारात आज दिवभरात चढ-उतारानंतर अखेरच्या सत्रात चांगलीच तेजी पाहायला मिळाली आहे. बाजाराच्या या तेजीत अदानी समूहाच्या शेअर्सनं सर्वाधिक उसळी घेतली आहे. अदानी समूहाच्या काही कंपन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत तेजी सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली आहे.
अदानी समूहाच्या एकूण ७ कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. आजच्या व्यवहाराअंती ६ कंपन्यांमध्ये मोठी वाढ झाली, तर केवळ अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्र आज निराशाजनक पातळीवर बंद झाले. पण इतर सहा कंपन्यांच्या तेजीमुळे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे.
अदानी पावरच्या शेअर्सची मोठी उसळीअदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मंगळवारी सर्वाधिक वाढ दिसून आली. सुमारे १४ टक्क्यांनी शेअर वधारुन १७३.५५ रुपयांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो १८१.४० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे, अदानी विल्मर शेअर ९ टक्क्यांनी वाढून ५०३ रुपयांवर बंद झाला. सोमवारीही या शेअर्समध्ये १०० टक्क्यांवर अपर सर्किट लागलं होतं. अदानी विल्मरचे मार्केट कॅप ६४,९७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढंच नाही तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पावर आणि अदानी ट्रान्समिशनसह अदानी विल्मारचा शेअर सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे.
याशिवाय अदानी समूहाची लार्ज कॅप कंपनी अदानी पोर्टचे शेअर्स ३.३९ टक्क्यांनी वाढून ७६२ रुपयांवर बंद झाले. तर अदानी टोटल गॅसचा स्टॉक १.८५ टक्क्यांच्या वाढीसह २१८० रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ०.९२ टक्क्यांच्या वाढीसह २४६१ रुपयांवर बंद झाले. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ०.४० टक्के वाढून १९१७ रुपयांवर बंद झाले. फक्त अदानी ग्रीन एनर्जीचा स्टॉक ०.४०% घसरून १९२३ वर बंद झाला.
अदानी ग्रूपच्या कोणत्या शेअरमध्ये किती वाढ?- अदानी पावरच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची वाढ- अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये ८.४५ टक्क्यांची वाढ- अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये ३.३९ टक्क्यांची वाढ- अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये १.८५ टक्क्यांची वाढ- अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ०.९२ टक्के वाढ- अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअरमध्ये ०.४० टक्क्यांची वाढ- अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ०.४० टक्क्यांची घसरण