Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्सना सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलंय. पाहा कारण.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:04 PM2024-03-18T12:04:18+5:302024-03-18T12:05:56+5:30

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्सना सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलंय. पाहा कारण.

Shares of Anil Ambani s reliance power company surge from rs 1 to rs 23 Now the Upper Circuit icici bank settlement agreement | अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹१ वरून पोहोचला ₹२३; आता अपर सर्किट

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्सना सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलंय. सोमवारी कंपनीचे शेअर्स 5% च्या वाढीसह 23.20 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारीही रिलायन्स पॉवरच्या शेअर्सना अपर सर्किटवर लागलं होतं. रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या उच्चांकी स्तरावरून 99 टक्क्यांनी घसरून 1 रुपयांपर्यंत आले होते. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली असून आता रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं 23 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 
 

ICICI सोबत सेटलमेंट अॅग्रीमेंट
 

रिलायन्स पॉवरनं आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलंय की, लोन सेटलमेंटसाठी, कंपनी आणि तिचे प्रवर्तक रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी 14 मार्च 2024 रोजी ICICI बँक लिमिटेडसोबत सेटलमेंट अॅग्रीमेंट केलं आहे. कंपनीच्या कर्जाशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या निकाली काढण्यात आल्या आहेत. या करारानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स शुक्रवारी 10 टक्क्यांहून अधिक वाढून 237.25 रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 247.10 रुपयांवर पोहोचले. 
 

99 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण
 

रिलायन्स पॉवरचे शेअर्स त्यांच्या उच्चांकी स्तरावरून 99 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. 16 मे 2008 रोजी कंपनीचे शेअर्स 260.78 रुपये होते. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची घसरण सुरूच राहिली आणि 27 मार्च 2020 रोजी तो 1.13 रुपयांवर पोहोचला. परंतु गेल्या 4 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी झाली आहे. 18 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 23.23 रुपयांवर पोहोचले आहेत. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षांत 1955 टक्क्यांची वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 33.10 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 9.05 रुपये आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of Anil Ambani s reliance power company surge from rs 1 to rs 23 Now the Upper Circuit icici bank settlement agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.