Cochin Shipyard Share : संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. सरकारी मालकीच्या कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली. कंपनीचा हिस्सा विकण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर शेअर्समध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कोचीन शिपयार्डमधील ५ टक्के हिस्सा सरकार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार असून, त्यासाठी १,५४० फ्लोअर प्राइस निश्चित करण्यात आली आहे. सुमारे २,०२६ कोटी रुपयांचा हिस्सा विकण्यासाठी दोन दिवसांची ऑफर फॉर सेल (OFS) आज पासून सुरू झाली आहे.
ओपन झाला OFS
बुधवारी कोचीन शिपयार्डचा शेअर १,६७१.९५ रुपयांवरून जवळपास पाच टक्क्यांनी घसरून १,५९० रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. ओएफएससाठी निश्चित केलेली १,५४० रुपये प्रति शेअरची फ्लोअर प्राइस मंगळवारच्या १,६७३ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी आहे.
मंगळवारी एनएसईवर हा शेअर सोमवारच्या बंद किमतीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक म्हणजे ४८.60 रुपयांनी वाढून बंद झाला. बेस इश्यूमध्ये २.५% इक्विटी हिस्सा विकण्याचा समावेश आहे, ज्यामध्ये ६५,७७,०२० शेअर्स विकण्यात येणार आहेत आणि २.५% ग्रीन शू ऑप्शनचा पर्याय असेल. नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल (OFS) आज, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी हा गुरुवार खुला असेल.
वर्षभरात २००% पेक्षा अधिक रिटर्न
संरक्षण क्षेत्रातील शेअर कोचीन शिपयार्डचा शेअर जुलैमध्ये ५२ आठवड्यांच्या उच्चांकी २,९७९.४५ रुपयांवरून जवळपास ८० टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले आहेत, तर ६ महिन्यांत गुंतवणूकदार ४४ टक्क्यांनी वधारले आहेत. एका वर्षात कंपनीनं २१५ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला असून, शेअरधारकांचे पैसे तिप्पट केले आहेत. चालू कॅलेंडर वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये आतापर्यंत १४६ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)