Join us

IRFC च्या शेअर्सनं वर्षभरात दिलाय ६ पट रिटर्न, घेण्यापूर्वी वाचा ही बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:42 AM

IRFC share price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना सहा पट परतावा दिला आहे. पुढे कशी असेल स्थिती काय म्हणतायत आकडे?

IRFC share price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयआरएफसी) शेअर्सनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना सहा पट परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ज्यांनी या रेल्वे शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य आता ६ लाखांहून अधिक झालं आहे. या कालावधीत शेअरनं ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यात गुंतवणूक करणं किंवा आता वाट पाहणे योग्य आहे का? जाणून घेऊ.

यासाठी आधी त्याचा क्यूव्हीटी स्कोअर बघा. लाइव्ह मिंटवर दिलेल्या क्वालिटी, व्हॅल्यूएशन आणि टेक्निकल स्कोअरनुसार आयआरएफसीने क्वालिटीच्या बाबतीत १०० पैकी ७७ गुण मिळवले आहेत. म्हणजे त्याची आर्थिक ताकद अधिक आहे. व्हॅल्यूएशन स्कोअर १०० मध्ये २५ आहे, ज्यावरून शेअरचं मूल्य सध्या खूप जास्त असल्याचं दिसून येतं. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यात तेजी आहे. या निकषावर त्याला १०० पैकी ७४ गुण मिळाले आहेत.

खरेदी करण्यापूर्वी तपासा

फायनान्शिअल, ओनरशिप, पार्टनर कंपन्यांशी तुलना, व्हॅल्यू आणि मोमेंटम अशा चेक लिस्टवर नजर टाकली तर हा शेअर ४०.९१ टक्क्यांच्या जवळपास आहे. आर्थिक आघाडीवर यात २ पॉझिटिव्ह आणि ६ निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. ओनरशिपमध्ये २ पॉझिटिव्ह आणि १ निगेटिव्ह आहे. व्हॅल्यू आणि मोमेंटममध्ये ४ पॉझिटिव्ह आणि ४ निगेटिव्ह पॉईंट्स आहेत.

शेअरची स्थिती

लाइव्ह मिंटचं रिस्क मीटर पाहिले तर हा रेल्वे स्टॉक ६४ टक्के हाय रिस्क वर आहे. त्याचबरोबर त्याच्या शेअरच्या किमतीची हिस्ट्री पाहिली तर हा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. आज हा शेअर २०९.८० रुपयांवर उघडला आणि ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर २१३.२४ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास तो २.३४ टक्क्यांनी घसरून १९७.२९ रुपयांवर आला.

केडिया कॅपिटल्सचे अध्यक्ष अजय केडिया यांनी आयआरएफसीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी १९८ रुपयांवर खरेदीचा सल्ला दिला असून २६५ रुपयांचे टार्गेट प्राइस दिलं आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजार