Lokmat Money > बिझनेस न्यूज > रॉकेट स्पीडनं वाढताहेत पेट्रोल विकरणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स, किंमत 'ऑल टाईम हाय'वर

रॉकेट स्पीडनं वाढताहेत पेट्रोल विकरणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स, किंमत 'ऑल टाईम हाय'वर

मंगळवारी सरकारी इंधन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. पाहा काय म्हटलं ब्रोकरेजनं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:37 PM2024-07-30T16:37:56+5:302024-07-30T16:38:41+5:30

मंगळवारी सरकारी इंधन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. पाहा काय म्हटलं ब्रोकरेजनं.

Shares of petrol selling companies are increasing bpcl iocl hpcl price at all time high | रॉकेट स्पीडनं वाढताहेत पेट्रोल विकरणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स, किंमत 'ऑल टाईम हाय'वर

रॉकेट स्पीडनं वाढताहेत पेट्रोल विकरणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स, किंमत 'ऑल टाईम हाय'वर

अनुकूल रिफायनिंग आणि मार्केटिंग आउटलुकमुळे मंगळवारी सरकारी इंधन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांच्या शेअर्सनं आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी उच्चांकी पातळी गाठली. बीपीसीएलच्या शेअरबद्दल बोलायचं झाले तर दिवसभरात तो ६ टक्क्यांहून अधिक वाढून ३५९.०५ रुपयांवर पोहोचला. एचपीसीएलबद्दल बोलायचं झालं तर तो ६ टक्क्यांनी वाढून ४०१.७० रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा (IOC) समभाग सुमारे तीन टक्क्यांनी वधारून १८५.९५ रुपयांवर पोहोचला.

कॅलेंडर इयर २०२४ मध्ये बीपीसीएल (५७ टक्के), एचपीसीएल (४६ टक्के) आणि आयओसी (४२ टक्के) नं आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. त्या तुलनेत बीएसई सेन्सेक्स १३ टक्क्यांनी वधारला आहे.

बीपीसीएलवर ब्रोकरेज बुलिश

दरम्यान, जपानमधील ब्रोकरेज फर्म नोमुराने बीपीसीएलबाबत पॉझिटिव्ह आऊटलूक ठेवला आहे. अनुकूल रिफायनिंग आणि मार्केटिंगच्या दृष्टीकोन तसंचआकर्षक मूल्यांकनाच्या आधारं ब्रोकरेजनं शेअरसाठी ३६८ रुपयांचे लक्ष्य ठेवलं आहे. यासह ब्रोकरेजनं आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of petrol selling companies are increasing bpcl iocl hpcl price at all time high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.