Lokmat Money > बिझनेस न्यूज > 673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

विविध ब्रोकरेज कंपन्यादेखील एसबीआयच्या या शेअर्सवर फिदा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:19 PM2022-06-14T17:19:39+5:302022-06-14T17:20:07+5:30

विविध ब्रोकरेज कंपन्यादेखील एसबीआयच्या या शेअर्सवर फिदा आहेत.

Shares of SBI can reach Rs 673, stocks are getting cheaper expert bullish on sbin | 673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

673 रुपयांवर पोहोचू शकतो SBI चा शेअर, स्वस्तात मिळतोय स्टॉक, ...तर होऊ शकतो छप्परफाड नफा

जर आपण शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअर्समधून चांगले पैसे कमवू शकता. खरे तर या PSU बँकिंग स्टॉकवर (Banking stock) ब्रोकरेज फिदा आहेत. ते यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. सध्या BSE वर एसबीआयचा शेअर (SBI share price) 447.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा शेअर 600 रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो.

काय म्हणतात तज्ज्ञ -
एसबीआयचा शेअर 7 फेब्रुवारी, 2022 रोजी 549 रुपयांना 52 आढवड्यांच्या हाय लेव्हलवर आणि 21 जून, 2021 रोजी 400.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील खालच्या पातळीवर पोहोचला होता. यावरून हा स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांतील हाय लेव्हलवरून 18.50 टक्के खाली आणि 11.73 टक्यांच्या जवळपास ट्रेड करत आहे, असे दिसून येते. स्टेट बँक ऑफ इंडियासाठी नवा RSI स्तर 36.30 एवढा आहे. यावरून स्टॉक ना अधिक खरेदी केला गेला आहे, ना अधिक विकला गेला आहे, असे यावरून स्पष्ट होते.

किती आहे शेअर टार्गेट? -
विविध ब्रोकरेज कंपन्यादेखील एसबीआयच्या या शेअर्सवर फिदा आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी 600 रुपये एवढी टार्गेट  प्राइस सेट केली आहे. अर्थात, सध्याच्या स्तरापेक्षा 35 टक्क्यांची वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्योरिटीजने 673 रुपयांची टार्गेट प्राइस सेट केली आहे. म्हणजेच शेअरच्या सध्याच्या किंमतीपेक्षा 50 टक्क्यांची शक्यता आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Shares of SBI can reach Rs 673, stocks are getting cheaper expert bullish on sbin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.