Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुस्लिम राष्ट्रांमध्ये क्रिप्टो स्वीकारण्यास उत्तेजन देण्यासाठी शरिया-अनुपालक टोकन सेट

मुस्लिम राष्ट्रांमध्ये क्रिप्टो स्वीकारण्यास उत्तेजन देण्यासाठी शरिया-अनुपालक टोकन सेट

HAQQ या कॉसमॉस SDK सह तयार केलेले नैतिक-प्रथम L1 ब्लॉकचेनने एक उत्तम पर्याय दिलेला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 04:04 PM2023-08-12T16:04:27+5:302023-08-12T16:05:10+5:30

HAQQ या कॉसमॉस SDK सह तयार केलेले नैतिक-प्रथम L1 ब्लॉकचेनने एक उत्तम पर्याय दिलेला आहे. 

Sharia Compliant Token Set to Encourage Crypto Adoption in Muslim Nations | मुस्लिम राष्ट्रांमध्ये क्रिप्टो स्वीकारण्यास उत्तेजन देण्यासाठी शरिया-अनुपालक टोकन सेट

मुस्लिम राष्ट्रांमध्ये क्रिप्टो स्वीकारण्यास उत्तेजन देण्यासाठी शरिया-अनुपालक टोकन सेट

 इस्लामिक वित्त आणि क्रिप्टोकरन्सी यांना मिळणाऱ्या जागतिक स्वीकृतीमुळे आर्थिक परिदृश्यातील एक आकर्षक बदल झालेला दिसून येतो. असे असले तरीही, या दोन आर्थिक प्रतिमानांमध्ये एक ठराविक अंतर आहे. हे अंतर भरून करण्यासाठी, HAQQ, या कॉसमॉस SDK सह तयार केलेले नैतिक-प्रथम L1 ब्लॉकचेनने एक उत्तम पर्याय दिलेला आहे. HAQQ शरिया कायद्याशी सुसंगत विकेंद्रित वित्ताच्या एकत्रीकरणाचा मार्ग सोपा करते. त्याचे मूळ चलन, इस्लामिक नाणे ($ISLM), हे जगातील सर्वप्रथम पूर्णपणे शरीयत-अनुपालक मालमत्ता आहे.  HAQQ इकोसिस्टममध्ये जसजशी नावीन्यपूर्ण वाढ होत आहे, तसतसा अधिक विस्तार शक्य आहे. हे विशेषतः एक उदाहरण आहे कारण $ISLM एक्स्चेंजवर सूचीबद्ध होण्याची तयारी करते, ज्यामुळे त्याची प्रवेशयोग्यता लक्षणीयरित्या विस्तृत होऊ शकते. 

HAQQ आणि इस्लामिक नाणे केवळ शरियत कायद्याचे पालनच करत नाहीत तर नैतिकता, पारंपारिक आर्थिक मानके आणि आधुनिक तांत्रिक नवकल्पनांचे उल्लेखनीय एकत्रीकरण त्यांच्यात दिसून येते. ते डिजिटल आणि विकेंद्रित वित्तसंस्थेच्या दृष्टीकोनाची व्याख्या नव्याने करतात, इस्लामिक नैतिक तत्त्वे, प्रस्थापित आर्थिक नियम आणि अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे वेगळ्या प्रकारे एकत्रीकरण करतात. जगभरातील आर्थिक व्यवहारांमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

इस्लामिक नाण्यामुळे एक अशी परिसंस्था मिळते जिथे एकाच वेळी इस्लामिक आर्थिक परंपरांची अखंडता जपली जाते आणि त्याच वेळी जागतिक बँकिंग सर्वोत्तम पद्धती लागू केल्या जातात. हे नैतिक तत्त्वे, आर्थिक कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे मजबूत एकत्रीकरण आहे ज्याची रचना इस्लामिक वित्तव्यवस्थेत अंतर्भूत असलेल्या आर्थिक न्याय आणि सामाजिक कल्याणाच्या तत्त्वांचे समर्थन करताना आधुनिक बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. 

पारंपारिक आणि इस्लामिक वित्त यांच्यातील अंतर कमी करणे
इस्लामिक नाण्याचे  प्राथमिक उद्दिष्ट पारंपारिक आणि इस्लामिक वित्त यांच्यातील अंतर  दूर करणे हे  आहे. असे करण्यासाठी ते जागतिक मुस्लिम लोकसंख्येमध्ये आर्थिक सर्वसमावेशकता सुधारण्यासाठी रचना केलेली नैतिक आर्थिक चौकट स्थापन करते.  या संक्रमणाचा एक महत्त्वाचा भाग विकेंद्रित वित्ताच्या वाढीस कारणीभूत आहे, जो जगाच्या आर्थिक परिदृश्याला नव्याने आकार देत आहे.

इस्लामिक नाण्याच्या मूल्याचा प्रस्ताव विकेंद्रित वित्ताचे प्रमुख फायदे अधोरेखित करतो जसे की पारदर्शकता, स्टॅकिंग, इंटरऑपरेबिलिटी आणि रिअल-टाइम व्यवहार. त्याच वेळी, ते सर्वांगीण आणि नैतिक दृष्टिकोन स्वीकारून, अनैतिक प्रथांच्या विरोधात ठाम भूमिका मांडते. बँकांनी  व्यवस्थापन केलेल्या पारंपारिक विश्वासू पैशाच्या अगदी उलट, इस्लामिक नाणे आणि HAQQ व्याजातून नफा मिळवण्यापासून परावृत्त करतात- ज्याला सामान्यत: रिबा म्हणून ओळखले जाते- इस्लाममध्ये कठोरपणे निषिद्ध असलेली प्रथा. हा फरक एका नैतिक, सर्वसमावेशक आणि शरियत-अनुपालक दृष्टिकोनासह आर्थिक जागेची व्याख्या नव्याने निर्माण करण्यासाठी  एक परिवर्तनकारी पाऊल अधोरेखित करतो.

मोहम्मद अलकाफ अलहश्मी, इंडस्ट्री 4.0, AI, मशीन लर्निंग, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि IOT मध्ये खोलवर रुजलेले अनुभवी तज्ञ म्हणतात की, "ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीच्या बदल होणाऱ्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या आपल्या प्रवासात, आपण वेगळे मूल्य प्रपोझिशनची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. इस्लामिक कॉईन आणि HAQQ  मध्ये आपण तेच करत आहोत. आपण मूव्हर्स म्हणून फक्त स्वतःची जागा तयार करत नाही, तर जागतिक समुदायाला अभूतपूर्व मूल्यही देत आहोत," 

ते पुढे म्हणतात, "वास्तविक-जगातील आव्हाने सोडवण्याची आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची माझी पार्श्वभूमी आणि आवड लक्षात घेता, मी या प्लॅटफॉर्मकडे मुस्लिम समुदायासाठी आणि त्याही पलीकडील एक अनोखी संधी म्हणून पाहतो. विकेंद्रित वित्ताला नाविन्यपूर्ण क्षमतेची जोड देण्याचा आमचा हेतू आहे. जागतिक पातळीवर वाढ, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता चालविण्याचे हे एक मजबूत साधन आहे. आम्ही सकारात्मक बदल घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि इस्लामिक नाणे आणि HAQQ अधिक न्याय्य आणि नाविन्यपूर्ण आर्थिक भविष्याकडे पाऊल टाकत आहेत हा आमचा विश्वास आहे. "

समाजासाठी मूल्य निर्माण करणे
प्रमुख जागतिक क्रिप्टो एक्स्चेंजवर इस्लामिक नाण्याची नजीकची सूची ही वित्त जगतातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. इस्लामिक नाणे हे आपल्या प्रकारातील पहिले असण्याची तयारी दाखवणारी, इस्लामिक तत्त्वे आणि परंपरांवर दृढपणे निर्माण असलेली एक परिसंस्था आहे. डिजिटल मालमत्ता म्हणून, $ISLM ची रचना मुस्लिम लोकांत विश्वास वाढवण्यासाठी आणि सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या विशिष्ट उद्देशाने केली गेली आहे. इस्लामच्या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून आणि क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकारास प्रोत्साहन देणारे  इस्लामिक नाणे हे केवळ एक टोकन नाही, तर 185 देशांमध्ये इस्लामिक वित्ताच्या विस्ताराला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्णतेचे एक साधन बनले आहे. हे एका नवीन दृष्टिकोना देते जो  विकसित होत असलेल्या आर्थिक लँडस्केपशी धोरणात्मकपणे संरेखित आहे.

तथापि, $ISLM चा विस्तार केवळ शरीयत-अनुपालक साधन असण्यापलीकडे आहे. त्याची रचना समुदाय कल्याण आणि परतफेड करण्यावर भर देते, आणि सदाबहार DAO मधून प्रकट होते. ही परोपकारी संस्था धर्मादाय आणि जगभरातील मुस्लिम समुदायांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. या प्रणालीचा एक अनोखा पैलू असा आहे की जेव्हा प्रत्येक वेळी इस्लामिक नाणे तयार केले जाते किंवा व्यवहार शुल्क भरले जाते, तेव्हा उदारतेची एक लहर येते—दिलेल्या रकमेच्या १० % किंवा गॅस फीच्या 10% रक्कम एव्हरग्रीन DAO मध्ये फनेल केले जाते. हे निधी  नंतर इस्लामिक प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरले जातात किंवा इस्लामिक धर्मादाय संस्थांना वितरित केले जातात. अशाप्रकारे, टोकन फक्त अर्थव्यवस्थेतच फिरत नाही तर जातीय उत्थानासाठी सक्रियपणे योगदान देते, ज्यामुळे व्यापक आर्थिक फायदे निर्माण होतात.

पायनियरिंग हलाल क्रिप्टोचा शोध 
खाजगी विक्रीदरम्यान, इस्लामिक नाण्याने जगभरातील विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांचे आकर्षून घेतले आणि यशस्वीरित्या 400 दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी रक्कम जमा केली. हे महत्वाचे आर्थिक पाठबळ डिजिटल मालमत्ता उद्योगातील इस्लामिक कॉनाण्याच्या दृष्टीकोनाचे अनुनाद स्पष्टपणे दाखवून देते. भक्कम पाठिंबा त्याच्या मूल्य प्रस्तावाला विश्वासार्हता देतो,  ज्यामुळे त्याच्या प्रगतीला चालना मिळते आणि भविष्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी व्यासपीठ तयार होते.

जागतिक मुस्लीम लोकसंख्या, जी सध्या 2 अब्जांच्या जवळपास आहे, आणि  2060 पर्यंत ती   3 अब्जांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानुसार, इस्लामिक वित्त बाजार 2024 पर्यंत संभाव्यतः $3.69 ट्रिलियनपेक्षा अधिक वाढीचा मार्ग दाखवेल  असा अंदाज आहे. या वाढीचे श्रेय शरिया-अनुपालक वित्तीय सेवांच्या वाढत्या मागणीला जाते. शिवाय, हलाल उत्पादनांचा उद्योग समान वाढीच्या वळणावर आहे आणि जो  2025 पर्यंत तब्बल $4 ट्रिलियन ओलांडेल अशी अपेक्षा आहे. हा डेटा घातांकीय वाढ आणि या बाजारपेठांमध्ये असलेली अफाट क्षमता दाखवून देतो. 

इस्लामिक नाणे, जागतिक वित्ताला पाठबळ 
इस्लामिक नाणे चलनात आणल्याने केल्याने जागतिक, शरीयत-अनुपालक वित्तीय सेवांमध्ये नवीन युगाचा प्रारंभ झाला  आहे. हे केवळ मुस्लिम समुदायालाच नाही तर मोठ्या प्रमाणावर   जागतिक प्रेक्षकांनाही  सुरक्षित अनुपालन व्यवहार आणि इस्लामिक आर्थिक उत्पादने मिळवून देते.  इस्लामिक नाण्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे समर्थन आणि त्यासोबतचा फतवा. हा फरक क्रिप्टोकरन्सीच्या इस्लामिक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर देऊन, संभाव्य वापरकर्त्यांमध्ये विश्वास वाढवतो.

इस्लामिक नाण्याची स्थापना मुस्लिम सम्हणजे मुदायामध्ये आणि व्यापक जागतिक आर्थिक बाजारपेठेत इस्लामिक वित्त आणि क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. HAQQ इकोसिस्टमचे इस्लामिक तत्त्वांसाठी समर्पण, मुस्लिम अधिकार्‍यांच्या सहकार्याने, जगभरातील मुस्लिमांसाठी एक विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आर्थिक मंच स्थापन करण्यासाठीचे उद्दिष्ट आहे. यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या भागासाठी पूर्वी पोहोचण्यास कठीण असलेले महत्त्वाचे क्षेत्र अनलॉक होईल.

मुस्लिम समाज आणि त्याही पलीकडील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेला हा अभिनव उपक्रम, विकेंद्रीकृत वित्त (DeFi) आणि पारंपारिक वित्त (TradFi) या दोन्हींमध्ये गुंतलेल्यांचे लक्ष वेधून घेतो. जसजसे इस्लामिक नाणे अधिक समावेशक आर्थिक भविष्यासाठी मार्ग दाखवत आहे, तसतसात्याचा विकास वित्त जगतात एक महत्त्वाचा बदल दाखवतो जो कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याचे वचन देतो.

Web Title: Sharia Compliant Token Set to Encourage Crypto Adoption in Muslim Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.