Join us

Shark Tank India मध्ये उडवली खिल्ली; आता गुंतवणूक न केल्याची Ashneer Grover यांनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 12:08 PM

BharatPe मधून बाहेर पडल्यानंतर माजी एमडी अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर दिसले.

फिनटेत स्टार्टअप भारतपे (BharatPe) मधून बाहेर पडल्यानंतर माजी एमडी अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) नुकतेच एका सार्वजनिक मंचावर दिसले होते. शार्क टँक इंडिया (Shark Tank India) पासून चर्चेत आलेले अशनीर ग्रोव्हर हे यावेळी एका कॉमेड Youtube व्हिडीओमध्ये दिसले. त्यांनी यावेळी शार्क टँक दरम्यान, एका प्रोडक्टमध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल खंत व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्या प्रोडक्टची खिल्ली उडवली होती.

शार्क टँक इंडिया शो मध्ये आलेले एक कंटेस्टन्ट रोहित वॉरिअर (Rohit Warrier) यांनी आपल्या स्टार्टअपबद्दल माहिती देताना एक अजब प्रोडक्ट सर्वांसमोर ठेवला. त्यांची कंपनी सिपलाइन (Sippline) एक प्रोडक्ट तयार करते. या प्रोडक्टला त्यांनी ग्लास मास्क असं नाव दिलं होतं. यानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी संताप व्यक्त केला होता. तसंच ही काय मजा चालवलीये? ग्लासला मास्क लावण्याची आयडिया आली कुठून? असे प्रश्न त्यांनी केले होते. तसंच अन्य जजेसनाही हसू आवरलं नव्हतं.

अनेक दिवसांनंतर अशनीर ग्रोव्हर कॉमेडियन रोहन जोशी आणि साहिल शाह यांच्यासोबत एका व्हिडीओमध्ये दिसले. यावेळी त्यांनी अशनीर यांना सिपलाइन प्रोडक्टबद्दल विचारलं. "तुम्हाला सिपलाइनमध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल खंत वाटते का?" असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी आपल्याला खंत वाटते असं असं उत्तर दिलं. आपल्या जीवनात मोठ्या मनोरंजनाची संधी आपण गमावली असल्याचं त्यांनी सांगितलं. "जर आपण त्या कंपनीत गुंतवणूक करण्याची चूक केली असती आणि त्यांना पाच नवे प्रोडक्ट तयार करण्यास सांगितलं असतं तर आपण हसून हसून वेडे झालो असतो," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले.

टॅग्स :टेलिव्हिजनव्यवसाय