‘भारत पे’चे (Bharat Pe) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि उद्योगपती अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांचे वडील अशोक ग्रोवर यांचं मंगळवारी निधन झालं. अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर सर्वांसोबत ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या वडिलांसाठी एक भावनिक पोस्टही शेअर केलीये.
“बाय बाबा, लव्ह यू! स्वर्गात पापाजी, मोठी आई, आजोबा आणि आजीची काळजी घ्या,” असा संदेश अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या वडिलांसाठी लिहिलाय. अशनीर ग्रोव्हर यांचे वडिल एक चार्टर्ड अकाऊंटंट होते. ते पंचशील पार्क परिसरात वास्तव्यास होते.