Lokmat Money > बिझनेस न्यूज > Shark Tank India चे जज अमन गुप्ता यांना २० लाखांची गुंतवणूक फळली, कमावले ५.८ कोटी

Shark Tank India चे जज अमन गुप्ता यांना २० लाखांची गुंतवणूक फळली, कमावले ५.८ कोटी

शार्क टँक इंडियाचे पहिले दोन सीझनही मोठ्या प्रमाणात गाजले. पहिल्या सीझनमध्ये शार्क अमन गुप्ता यांनी केलेल्या गुंतवणूकीबाबत खुद्द त्यांनीच माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:49 AM2024-02-13T10:49:10+5:302024-02-13T10:49:23+5:30

शार्क टँक इंडियाचे पहिले दोन सीझनही मोठ्या प्रमाणात गाजले. पहिल्या सीझनमध्ये शार्क अमन गुप्ता यांनी केलेल्या गुंतवणूकीबाबत खुद्द त्यांनीच माहिती दिली आहे.

Shark Tank India judge Aman Gupta s investment of 20 lakhs paid off earning 5 8 crores Skippi Natural Ice Pops | Shark Tank India चे जज अमन गुप्ता यांना २० लाखांची गुंतवणूक फळली, कमावले ५.८ कोटी

Shark Tank India चे जज अमन गुप्ता यांना २० लाखांची गुंतवणूक फळली, कमावले ५.८ कोटी

सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू आहे. या सीझनमध्येही शार्क्सनं अनेक स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शार्क टँक इंडियाचे पहिले दोन सीझनही मोठ्या प्रमाणात गाजले. पहिल्या सीझनमध्ये शार्क अमन गुप्ता यांनी केलेल्या गुंतवणूकीबाबत खुद्द त्यांनीच माहिती दिली आहे. शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये अमन गुप्ता यांनी आईस पेप्सिकल ब्रँड स्किप्पीमध्ये २० लाखांची गुंतवणूक केली होती. अवघ्या दोन वर्षांत या ब्रँडनं २९०० टक्के रिटर्न देत त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य जवळपास ६ कोटींपर्यंत पोहोचवलंय. पहिल्या सीझनमध्ये अमन गुप्ता आणि अन्य चार शार्क्सनं मिळून या स्टार्टअपमध्ये १५ टक्के इक्विटीसाठी १ कोटींची गुंतवणूक केली होती.
 

ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट २०२४ मध्ये अमन गुप्ता यांना यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पहिल्या सीझनमध्ये त्यांनी एकूण ६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे २० स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती, असंही त्यांनी नमूद केलं. "मी स्किप्पीमध्ये २० लाख रुपये गुंतवले आहेत आणि मला ६ कोटी रुपयांत एक्झिट मिळत आहे. त्यामुळे एकच कंपनी स्वतःच मला इतर सर्वांचा रिटर्न देत आहे," असं अमन गुप्ता यांनी हाय रिस्क हाय रिवॉर्ड बाबत समजावताना सांगितलं.
 

स्किपीला न केवळ शार्ककडून मिळालेल्या फंडिंग आणि मदतीचा फायदा झाला, तर ब्रँडला मिळालेल्या प्रसिद्धीचाही फायदा झाला. कंपनीच्या विक्रीत १०० पट वाढ झाली आणि आता ती आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १०० कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवत आहे.
 

"दोन वर्षांपूर्वी, माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे नव्हते. माझी पत्नी कमावत होती. मला २०२१ मध्ये सेकंडरी एक्झिट मिळाली. शार्क टँकचं ते पहिलं वर्ष होते. मला तुम्ही आतापर्यंत किती गुंतवणूक केली आहे याची यादी विचारण्यात आली होती. मी तोपर्यंत ५ को इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या, ज्यांची किंमत सुमारे ५-१० लाख रुपये होती. त्यामुळे मी शार्क टँकमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूकदार बनलो," असे अमन गुप्ता म्हणाले.
 

यांच्याकडून शिकलो
 

नमिता थापर आणि अनुपम मित्तल यांसारख्या शार्क्ससोबत बसून गुंतवणूक करण्याची कला शिकल्याचं त्यांनी सांगितलं. "त्यांनी आयुष्यभर गुंतवणूक केली आहे. मी शार्क टँकवर खूप काही शिकलो आणि मी आता शार्क टँकच्या बाहेर गुंतवणूक करत नाही," असं गुप्ता म्हणाले.
 

आयपीओबाबत काय म्हणाले?
 

D2C ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँड बोटनं आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४ हजार कोटी रुपयांची विक्री केली होती. यापूर्वी, कंपनीनं बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) २ हजार कोटी रुपयांच्या आयपीओसाठी (IPO) एक ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता, परंतु कंपनीने सक्रियपणे त्याचा मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मागे घेतला. दरम्यान, आपल्याला लिस्टिंगची घाई नाही करण्याची घाई नाही आणि आयपीओसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ वर विचार करत असल्यानंत नंतर त्यांनी सांगितलं होतं.

Web Title: Shark Tank India judge Aman Gupta s investment of 20 lakhs paid off earning 5 8 crores Skippi Natural Ice Pops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.