Join us

Shark Tank Ashneer Grover : शार्क टँकचा जज अशनीरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही म्हणाल व्हॉव.., सोबतच दिल्या या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 1:33 PM

अशनीर ग्रोव्हर शार्क टँक इंडियापासून चर्चेत आले होते. यामध्ये ते शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाले होते.

अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) शार्क टँक इंडियापासून (Shark Tank India) चर्चेत आले होते. यामध्ये ते शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाले होते. सध्या अशनीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी तब्बल १० किलो वजन कमी केलं आहे.

आपलं ध्येय गाठण्यासाठी कोणत्या दोन गोष्टींचा वापर केला आहे याची माहितीही अशनीर ग्रोव्हर यांनी दिली आहे. शिस्त आणि दृढनिश्चय अशा दोन टीप्स अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या फॉलोअर्सना दिल्या आहेत. शार्क टँक इंडिया या बिझनेस रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून प्रसिद्ध झाल्यापासून अशनीर ग्रोव्हर वजन कमी करण्यावर काम करत आहे. फिट राहण्याचा प्रयत्न करताना त्यांना आलेल्या समस्यांबद्दल त्यांनी अनेकदा सांगितलंही आहे. तथापि, सोशल मीडियावर वजन कमी करण्याबाबत अशनीर ग्रोव्हरचे हे पहिले अपडेट नाही. जूनमध्ये पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अशनीर ग्रोव्हर यांनी वजन कमी करण्याचे आणखी एक अपडेट शेअर केले. त्यांनी त्याचे श्रेय चांगल्या खाण्याला आणि चालण्याच्या सवयीला दिलं होते. एका मुलाखतीदरम्यानही त्यांनी मला आपलं वजन कमी करायचं होतं आणि मला हे आवडतं असं म्हटलेलं. सध्याकाळचा आपली स्नॅक्सची वेळ आता जिममध्ये वर्कआऊट करण्यात घालवत आहोत. पूर्वी संध्याकाळी सहा वाजता पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर पडत होतो, आता त्या वेळेचा सदुपयोग व्यायाम करण्यासाठी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :आरोग्यइन्स्टाग्राम