बहुप्रतिक्षीत शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन आजपासून सुरू होणार आहे. शार्क टँकच्या पहिल्या सीझनला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली होती. अमेरिकेतील शार्क टँक या शो चं हे इंडियन व्हर्जन आहे. गेल्या महिन्यात या शो चा प्रोमो लाँच करण्यात आला होता. या शो च्या प्रोमोनंतरही अनेक प्रेक्षक याच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येतंय. जवळपास वर्षभरानंतर शार्क टँक इंडिया पुनरागमनासाठी तयार आहेत.
शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन २ जानेवारी रोजी म्हणजेच आज रात्री १० वाजल्यापासून प्रसारित केला जाणार आहे. सोनी टीव्ही व्यतिरिक्त सोनी लिव्ह, युट्यूबवरही हा शो पाहता येईल. आता संपूर्ण भारत व्यवसायाचं मूल्य समजेल असं मेकर्सनं शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनबद्दल पोस्ट करताना म्हटलं.
Shark Namita Thapar outlines her previous experiences as well as her goals for the new season of Shark Tank India!
— Sony LIV (@SonyLIV) January 1, 2023
Watch #SharkTankIndia season 2 from 2nd Jan, on Sony LIV and Sony Entertainment Television. pic.twitter.com/XKipSMX9S2
कोण आहेत शार्क्स?
या शो मध्ये बोट कंपनीचे फाऊंडर अमन गुप्ता, लेन्सकार्टचे को-फाऊंडर पीयूष बन्सल, शुगरच्या को फाऊंडर विनीता सिंग. एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या सीईो नमिता थापर, शादी डॉट कॉमचे प्रमुख अनुपम मित्तल आणि कार देखो चे फाऊंडर अमित जैन शार्क्स असतील. अशनीर ग्रोव्हर यांना अमित जैन यांनी रिप्लेस केलं आहे. पहिल्या सीझनमध्ये शार्क्सनं ६७ व्यवसायांमध्ये ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.