Shark Tank India: टेक जायंट Google च्या नवीन Play Store धोरणांविरुद्ध लढा देणाऱ्या Shaadi.com चे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांनी सोमवारी कंपनीला "डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी" म्हटले. तसेच, वेळीच उपाय केला नाही, तर या कंपन्यांना आपले आर्थिक भविष्य नियंत्रित करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असेही सांगितले.
So, is Google evil? I will leave that for you to decide.
— Anupam Mittal (@AnupamMittal) March 4, 2024
But, one thing is certain: This is the new Digital East India Co. and if we don’t put in the right safeguards now, nothing can prevent these companies from controlling our economic future.
Thankfully, India has changed…
मित्तल यांनी अनेक ट्विटर पोस्टमधून म्हटले की, भारत बदलतोय आणि आपल्याकडे आज एक मजबूत आणि सक्रिय सरकार आहे, जे या बिग टेकच्या खोटेपणाला, फसवणुकीला बळी पडणार नाही. गुगल आणि ऍपलला खुल्या इंटरनेट अर्थव्यवस्थेवर प्रभुत्व मिळवायचे आहे. त्यांनी आधीच इंटरनेटचा मोठा भाग काबीज केला आहे आणि आता त्यांना 100 टक्के वर्चस्व हवे आहे. ॲप डेव्हलपर्सकडे प्रीमियम सेवा असेल, तर Google त्यातून 11-30 टक्क्यांच्या दरम्यान शुल्क आकारू इच्छिते, तसेच डेव्हलपर दर महिन्याला Google कडे कर रिटर्न भरतील, जेणेकरून ते ऑडिट आणि शुल्क वसूल करू शकतील.
The core issue stems from Apple & Google’s attempts to move the open Internet to a closed app ecosystem where they can lord over the Internet economy. They have already succeeded in muscling large swathes of the Internet and now want 100% dominance.
— Anupam Mittal (@AnupamMittal) March 4, 2024
Current issue - Google wants…
Google म्हणते की, हे Play Store शुल्क इन्फ्रा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आहेत. यावर मित्तल यांनी युक्तिवाद केला की, जर हे खरे असेल, तर हे शुल्क फक्त प्रीमियम ॲप्ससाठीच का? Google फक्त APK (Android Package Kit) ला लिंक पुरवते आणि ॲप डेव्हलपरना कोणतीही पायाभूत सुविधा पुरवत नाही. Google फक्त पेमेंट गेटवे सेवांसाठी शुल्क आकारत आहे, ज्यासाठी बाजार दर एक टक्के आहे परंतु मक्तेदारीमुळे त्यांना 20 पट हवे आहेत.
निवडक देशांतर्गत स्टार्टअप्सच्या गटाने केंद्रीय आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी या अडचणीवर तपशीलवार चर्चा केल्यानंतर अनुपम मित्तल यांनी हे ट्विट्स केले आहेत.