Join us

Cyptocurrency: केवळ २ तासांत १००० रूपयांचे झाले ६० लाख; मिळाले जबरदस्त रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 9:04 PM

Cyptocurrency: सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सध्या क्रिप्टोकरन्सीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकांना जबरदस्त रिटर्न्स देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि लाखो पट परताना दिला आहे. सोमवारी एका नव्या क्रिप्टोकरन्सीनं मोठ्या प्रमाणात रिटर्न दिले. 

क्रिप्टोकरन्सीचं नाव Shih Tzu आहे. या क्रिप्टोकरन्सीचं नाव एका डॉग ब्रीडवरून ठेवण्यात आलं आहे. सोमवारी या करन्सीनं अवघ्या दोन तासांमध्ये कमाल केली. या क्रिप्टोकरन्सीमध्ये तब्बल 6 लाख टक्क्यांची वाढ झाली. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कॉईनमार्केटकॅपच्या डेटानुसार 2 तासांतच Shih Tzu मध्ये 6 लाख टक्क्यांची वाढ झाली. डिजिटल टोकन अवघ्या काही वेळात 0.000000009105 डॉलर्सवरून 0.00005477 डॉलर्सवर पोहोचली. यामध्ये ज्यानं १ हजार रूपयांची गुंतवणूक केली त्यांचे केवळ २ तासांमध्ये तब्बल ६० लाख रूपये झाले. एक्सचेंजमध्ये या डिजिटल टोकनचं व्हॉल्यूम ६५ टक्क्यांपर्यंत वाढलं.

बिटकॉईनच्या किंमतीत १२ टक्क्यांची घटगेल्या काही दिवसांमध्ये कोकोस्वॅप (Kokoswap), इथेरियम मेटा (Ethereum Meta) आणि ARC Governance सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. ही वाढ फार कमी कालावधीसाठी होती. Shih Tzu एक क्रॉस चेन बेस्ड मीम टोकन आहे. Shih Tzu च्या सर्क्युलेटिंग सप्लायबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची माहिती क्रिप्टो मार्केट ट्रॅक करणाऱ्या अनालिसिस्टचं म्हणणं आहे. सोमवारी बिटकॉईनच्या एका युनिटची किंमत 57,403.26 डॉलर्स इतकी होती. गेल्या सात दिवसांमध्ये यात 12.88 टक्क्यांची घसरण झाली.

टॅग्स :पैसागुंतवणूक